Subhash Phaldesai : आदिवासी आणि इतर समाजातील दरी भरून काढा

विद्यार्थ्यांचा सहभाग : केपे येथे ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम उत्साहात
Subhash Phaldesai
Subhash Phaldesai Dainik Gomantak

Subhash Phaldesai आदिवासी व इतर समाजामध्ये जीवनशैली, शिक्षण तसेच इतर माध्यमांतून जी दरी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याची वेळ आली आहे. या समाजातील युवा पिढीने फक्त शैक्षणिक फायद्यासाठी नाही, तर समाजातील लोकांसाठी काम करावे, असे उदगार समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काढले.

केपे सरकारी महाविद्यालयात दिशा फाऊंडेशन, ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सरकारी महाविद्यालय केपे, यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या ‘आयडियाथॉन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक शंकर गावकर, सागर वेर्लेकर, दिशा फाऊंडेशनचे विनित कुंडईकर, उपप्राचार्य सुशीला मोंतेरो, डॉ. मधू घोडकीरेकर आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शंकर गावकर, सागर वेर्लेकर, विनित कुंडईकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली.

Subhash Phaldesai
Margao News: खासदार सार्दिन यांच्या कृतीचा सर्व स्तरांतून निषेध

कुणबी व्हिलेज’

आदिवासी समाजासाठी सांगे मतदारसंघात ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केली असून केंद्र सरकारच्या मदतीने ‘कुणबी व्हिलेज’ स्थापन करण्यात येणार आहे. येथे गोव्याची खरी ओळख असलेली कुणबी साडी व शाल निर्मिती होणार असून यातून महिलांना उत्पन्नाचे साधन मिळणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

Subhash Phaldesai
Water Dispute: डोंगुर्लीत पाण्यासाठी वणवण

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा!

फळदेसाई म्हणाले, नैसर्गिक संपदेचे संरक्षण खऱ्या अर्थाने आदिवासींनी केले आहे. ज्यावेळी वन खाते अस्तित्वात नव्हते, तेव्हा जंगलात राहून याच लोकांनी झाडे व जनावरांचे संरक्षण केले, हे त्यांच्या लोकगीतांतून सिद्ध होते.

आज आदिवासी समाज व गावाच्या विकासावर अभ्यास करण्यासाठी जे विद्यार्थी इतर महाविद्यालयांतून आले आहेत, त्यांनी अभ्यासापुरते मर्यादित न रहाता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com