Bicholim Robbery: भामट्यांचा 'खाकी'वरच डाव, पण 'नव्या'ला 'जुना' नडला! निवृत्त ASI च्या सतर्कतेने तोतया पोलिसांचा बेत फसला; डिचोलीत खळबळ

Goa Fake Police: गेल्या आठवड्यात डिचोलीत महिलेला लुबाडण्यापूर्वी ‘त्या’ तोतया पोलिसांनी पोलिस सेवेतून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला लुबाडण्याचा प्रयत्न केला होता.
Goa Fake Police
Goa Fake PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गेल्या आठवड्यात डिचोलीत महिलेला लुबाडण्यापूर्वी ‘त्या’ तोतया पोलिसांनी पोलिस सेवेतून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला लुबाडण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्या भामट्यांचा प्रयत्न फसला.

अधिक माहिती अशी, की गेल्या शनिवारी (ता. २०) भर दुपारी डिचोलीत (Bicholim) माधवी नाईक या महिलेला लुबाडण्याचा प्रकार घडला होता. मोटारसायकलवरून आलेल्या त्या भामट्यांनी माधवीचे मंगळसूत्र पळविले होते. ही घटना घडण्यापूर्वी याच तोतया पोलिसांनी निवृत्त एएसआय नवनाथ नाईक यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला होता.

Goa Fake Police
Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

साधारण ११ वाजण्याच्या सुमारास नवनाथ नाईक हे बागायतदार बाजार समोरील रस्त्यावरून चालत असता, डिचोली अर्बन बँकेसमोर या तोतया पोलिसांनी नवनाथ यांना अडवून त्यांना त्यांच्या हातातील अंगठ्या आणि सोनसाखळी काढायला लावली. पोलिस असल्याचे ओळखपत्रही या भामट्यांनी नवनाथ यांना दाखविले. मात्र, पोलिस सेवेतील अनुभव असलेले नवनाथ नाईक त्या तोतया पोलिसांना बधले नाहीत. त्यामुळे त्यांना लुबाडण्याचा तोतयांचा बेत फसला.

सीसीटीव्ही फुटेज तपासा

हा प्रकार डिचोली अर्बन बँकेसमोर घडला. त्यामुळे मला अडवतानाचे दृश्‍य बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नक्कीच कैद झाले असेल. त्यामुळे बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासावे, अशी मागणी नवनाथ नाईक यांनी केली आहे. डिचोली पोलिसांनाही त्यांनी या घटनेचा तपशील सांगितला आहे.

Goa Fake Police
Baina Robbery Case: नायक कुटुंबीयांच्‍या दुकानातील जुना कामगारच निघाला दरोड्याचा सूत्रधार, 8 दिवसांत छडा; 6 जणांना मुंबईतून अटक

नंबरप्लेटशिवाय दुचाकी

''त्या'' तोतया पोलिसांकडे (Police) असलेले ओळखपत्र संशयास्पद असून, मोटारसायकलला नंबरप्लेटही नव्हती. असे नवनाथ नाईक यांनी दैनिक ''गोमन्तक''शी बोलताना सांगितले. या ''तोतया'' पोलिसांपासून जनतेने सावध रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भर शहरात लुबाडणाऱ्या ''त्या'' भामट्यांचा अद्याप सुगावा लागला नसल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com