Devotees left for Pandharpur from | Ashadhi Ekadashi File Photo
गोवा

Ashadhi Ekadashi: वारकऱ्यांचे सांगेनगरीत जल्लोषी स्वागत; 18 दिवसांचा प्रवास

यंदा प्रथमच काणकोणमधून पंढरपूरला निघाली पायी वारी

दैनिक गोमन्तक

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी काणकोण येथील श्री विठ्ठल-रखुमाई माऊली वारकरी मंडळातर्फे पायी वारी निघाली आहे. या वारकऱ्यांचे सांगेनगरीत नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. रात्री वारकऱ्यांनी मोले येथे विश्रांती घेतली.

हे वारकरी काणकोण ते पंढरपूर हे साडेचारशे किमी अंतर १८ दिवसांत पूर्ण करणार असून दिवसभरात सुमारे २५ किमी अंतर पायी चालत टाळ-मृदंग घेऊन भजन करत महिला-पुरुष मिळून सत्तेरकजण काणकोणमधून ११ जून रोजी वारीला निघाले आहे. अडणे-केपे येथे विश्रांती घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी केपे येथे तर तिसऱ्या दिवशी दुपारी सांगेत वारीचे आगमन झाले असता नागरिकांनी स्वागत केले.

या वारीत २५ ते ७० वर्षे वयाच्या महिला सहभागी झाल्या आहेत. यंदा प्रथमच काणकोणमधून वारीची सुरुवात करण्यात आली असून सांगे भागातून वारी निघणे आवश्यक आहे. कारण ही आमची संस्कृती असून ती आम्हीच टिकवून ठेवणे आवश्यक आहे, असे वारकरी म्हणाले.

विठ्ठलनामात वारकरी तल्लीन

या वारीत सहभागी होणाऱ्यांची गैरसोय होत नाही किंवा अडचणी येत नाहीत. विठ्ठल-रखुमाईच्या रूपाने वारकरी गावात आल्याची भावना निर्माण होऊन आदराने स्वागत केले जाते. या प्रेमाच्या बळावरच वारकरी तहान-भूक विसरून हे मोठे अंतर सहजपणे कापतात. विठ्ठल-रखुमाईचा ध्यास लागलेला वारकरी सगळे दुःख विसरून तल्लीन होऊन सतत १८ दिवस चालत विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, असे वारकऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT