Ganesh Chaturthi in Goa Dainik Gomantak
गोवा

कोरोना, महागाईचे संकट तरीही गणेश भक्तांचा उत्साह कायम!

गेल्या वर्षीपेक्षा यंदा चतुर्थी 22 दिवस उशिरा आली.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील जनता कोरोना व महागाईने मेटाकुटीला आली आहे. त्यात सणासुदीच्या काळात पडणाऱ्या पावसामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असानाही विघ्नहर्त्या गाणेशाला पारंपारिक पध्दतीने पुजण्यासाठी सर्वच जन उत्सुक आहेत. गणेशभक्तांची गणेशचतुर्थीची तयारी उत्साहात सुरु केली आहे. बाजार फुलले असून गणेश चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी नागरिक जोमात करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा चतुर्थी 22 दिवस उशिरा आलीय. तरीही पाऊस पडत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाचे संकट आहेच. मात्र याचा परिणाम गणेशभक्तांच्या उत्साहावर कुठेच दिसून येत नाही. आपल्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग व उत्साह दिसत असून घराघरांत गणेशाच्या नैवेद्यासाठी लागणारे फराळाचे गोडधोड पदार्थ करंज्या, लाडू, मोदक, चकल्‍या तयार केल्या जात आहेत. हिंदू सणातील राजा सण असलेल्या गणेश चतुर्थीसाठीची लगबग सध्या सर्वत्र दिसून येत असून गणेशमूर्ती घरोघरी नेल्या जात आहेत. गणेशाच्या मखरासाठी लागणारे साहित्य आणि माटोळीच्या वस्तू खरेदीसांठी राज्यातील सर्वच भागांत लगबग दिसत आहे.

Ganesh Chaturthi

भाविकांनी राज्यातील विविध भागांतील गणेश चित्रशाळांतून गणेशमूर्ती आपल्या घरी नेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे गणेशमूर्ती करण्यासाठी लागणारा कच्चामाल महाग झाल्यामुळे गणेशमूर्तींचे दरही वाढलेले आहेत. दीड फूट उंचीची गणेशमूर्ती सध्या 2 ते अडीच हजार रुपये तर दोन फुटाच्या मूर्ती 3 हजारांच्यावर किमतीने विकली जात आहे.

Goa market

गोव्याच्या सीमेलगतच्या सातार्डा, दोडामार्ग, चोर्लाघाट, अनमोड, कारवार या भागांतील हजारो नागरिक गोव्यात स्थायिक झालेत. मात्र ते गणेशाला आपल्या मुळगावी जातात. यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने काही प्रमाणात सूट असली तरी त्याबाबत स्पष्ट धोरण एकाही राज्याचे नाही. गोव्यातून जाण्यास दिले जाते. मात्र नागरिकांनी एकच डोस घेतलेला असल्यास त्यांच्या सीमेत त्यांना अडवले जात आहे, तर गोव्यात येणाऱ्यानाही एक, दोन्ही डोस घेतलेले नसल्यास चाचणीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे तिन्ही राज्याच्या सीमेलगतच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज आहे. नपेक्षा गणेशाच्या तोंडावर सीमेवर गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

Goa Market

एका वर्षाच्या कालखंडानंतर.. !

गेल्या वर्षी बहुतांश गावात परगावातून व्यक्ती येण्यास बंदी होती. गावातील व्यक्तीही परगावात राहात असल्यास यंदा तुम्ही गणेशाला येऊ नका! असे निरोप पाठवण्यात आल्याने अनेक गणेशभक्त मनात असूनही गेल्या वर्षी आपल्या मूळ गावी गणेशाला गेले नाहीत. आता दोन डोस घेतलेल्यांना ये जा करण्यास मुभा असल्याने बरेच लोक गावी जाणार आहेत.

बाप्‍पाचा ‘भाव’ वाढला!

कोविडमुळे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्याने तसेच धंदा मंदावल्याने लोक एका बाजूने आर्थिक तंगीत आहेत तर दुसऱ्या बाजूने महागाईच्या भडक्यालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्‍यातच गणेश चतुर्थी हा महत्त्‍वाचा सण एका दिवसावर येऊन ठेपला असून तो साजरा करण्‍यासाठी किमान 20 ते 30 हजार रुपये खर्च येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी रंग आणि मातीचे भाव वाढल्याने गणपतीच्या मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. मागच्या वर्षी बाप्पाची जी मूर्ती दोन हजाराला मिळत होती, ती यंदा तीन हजार रुपयांवर पोहोचली आहे. सजावटीच्या सामानाचे दरही वाढले आहेत.

Ganapati

गणपतीच्या मखरांची किंमत सहा ते सात हजार रुपये एवढी वाढली आहे. एका बाजूने एलपीजी गॅसची किंमत वाढलेली असतानाच तेल, तूप, कडधान्ये यांच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे लोकही चिंतेत आहेत. असे असले तरी सण चतुर्थीचा असल्याने हातही आखडता घेता येत नाही. बुधवारी मडगावच्या माटोळी बाजारात फेरफटका मारला असता माटोळी सामानाच्या दारात चौपट वाढ झाल्‍याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT