Goa: मातीच्या सुंदर गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा चालवणारे साजरो शेटगावकर

मोरजी येथील मातीच्या सुंदर मूर्ती बनवणारे साजरो शेटगावकर दरवर्षी आपल्या चित्र शाळेत मातीपासून गणेशमुर्त्या बनवून कलेची सेवा करत आहेत
मातीच्या सुंदर गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा चालवणारे साजरो शेटगावकर
मातीच्या सुंदर गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा चालवणारे साजरो शेटगावकर Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मातीत हात घालून सुंदर मूर्ती बनवणारे कट्टेवाडा मोरजी येथील साजरो शेटगावकर दरवर्षी आपल्या चित्र शाळेत मातीपासून गणेशमुर्त्या कलेची सेवा करत आहेत. कोरोनाचे महासंकट असूनसुद्धा त्यांच्या चित्रशाळेत गणपतीची संख्या वाढलेली आहे. आकार किंचित कमी झाला तरीही रंग मिळवताना, माती मिळवताना, अडचणीवर मात करत साजरो शेटगावकर यांनी आपल्या चित्र शाळेत दीडशे पेक्षा जास्त सुबक मुर्त्या केलेल्या आहेत. कलेचा वारसा ते चालवतात मात्र ते म्हणतात कुणीही कलेचा वारसा कुणी कुणावर लादू नये .

Dainik Gomantak

मोरजीतील साजरो शेटगावकर यांनी रंगभूषाकार म्हणून महाराष्ट्र व दिल्ली येथील नाट्य स्पर्धेत बक्षिसे मिळवलेली आहेत. शिवाय मातीलाही वेगवेगळा आकार देवून सुंदर मुर्तीही ते घडवतात. नाटकात रंगमंचावर नाट्यरसिकांना नट आणि स्त्री कलाकार , त्यातील कलाकार वेळोवेळी दिसत असतात. मात्र पडद्यामागील तांत्रिक बाजू सांभाळणारे कलाकार तेवढेच महत्वाचे असतात. ते कुठे दिसत नाही .

मातीच्या सुंदर गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा चालवणारे साजरो शेटगावकर
Goa Plan: पर्यटकांसाठी गोव्याच्या वाटा खुल्या

यंदा मातीचे रंग मिळवताना खूप अडचणी आल्या आहेत . त्या अडचणीवर मात करत काही मूर्ती कलाकारांनी केवळ चिकण मातीचाच उपयोग करून मुर्त्या बनवलेल्या आहेत . ग्राहकाला पीओपी चे आकर्षण असते . ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक चित्र शाळांमध्ये पीओपीच्या मुर्त्या उपलब्ध असतात . या मुर्त्या पर्यावरणास हानिकारक असल्याने आपण मात्र आपल्या चित्र शाळेत त्याला स्थान देत नसल्याचे साजरो शेटगावकर सांगतात . मातीला सुंदर आकार देताना ते रंगभूषाकार म्हणून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे .

साजरो शेटगावकर यांनी चित्र शाळेविषयी माहिती देतांना आपल्याकडील असलेल्या कलेचे प्रदर्शन समाजातील सर्व स्तरावर व्हावे, नवीन कलाकारांनी एका कलाकारांकडून दुसऱ्या कलाकाराचा वारसा चालवावा. ही कला वृद्धिंगत व्हावी हा मूळ उद्देश ठेवून आपण ही कला जोपासत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे रंगकाम मिळवतांना अडचणी आल्या शिवाय कामगार मिळवतानाही मोठे प्रयास करावे लागले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com