Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

यावेळी शिवोलीत कॉंग्रेसच बाजी मारणार: दिलायला लोबो

दैनिक गोमन्तक

Delilah Lobo: शिवोली कॉंग्रेसच्या उमेदवार दिलायला लोबो यांनी भाजपला रामराम करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर, आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचे पहिले कार्य असे आहे की त्यांना महिन्याभरात शिवोलीच्या संभाव्य भावी आमदार म्हणून पाहिले जावे. फक्त भाजपचे माजी मंत्री मायकल लोबो यांच्या पत्नी म्हणून न राहता शिवोलीच्या आमदार म्हणून त्यांना जनतेसमोर यायचे आहे.

नुकतीच तिने घरोघरी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली. आणि कोपरा सभादेखील सुरू केल्या आहेत. दिलायला लोबो (Delilah Lobo) यांनी शिवोली मतदारसंघात (Siolim Constituency) जास्तीत जास्त आघाडी घेऊन विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या 50 दिवसांच्या प्रचारात मला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मला विश्वास आहे की लोक नक्कीच बदल घडवून आणतील आणि आमचा विजय निश्चित आहे, असे लोबो म्हणाल्या.

शिवोलीच्या जनतेची पहिली मागणी अशी आहे की, त्यांच्या आमदारांनी त्यांना पाच वर्षांच्या कार्यकाळात कोपरा बैठकीच्या रूपात भेटत राहावे आणि त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. भूतकाळात आमदारांनी जे केले नाही ते पाच वर्षांत करायचे आहे.

यावेळी शिवोलीचे लोक कॉंग्रेसला मतदान करतील आणि ती एक महिला उमेदवार असेल. शिवोलीमध्ये कॉंग्रेसने कधीही जागा जिंकली नाही. पण यावेळी जनता कॉंग्रेसला (Congress) नक्की विजयी करेल. घरोघरी प्रचारादरम्यान लोकांनी तक्रारी केलेल्या दोन प्रमुख समस्या म्हणजे अनियमित पाणीपुरवठा आणि बेरोजगारी. पाणी ही मूलभूत गरज आहे ज्यासाठी शिवोलीमधील लोक झगडत आहेत. रोजगाराच्या बाबतीत, अशी काही कुटुंबे आहेत ज्यात चार लोक सरकारी नोकरीत आहेत तर अनेक कुटुंबातील सदस्यांना खाजगी नोकरी देखील नाही. हे बदलण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

मतदारसंघात रस्त्यांची दयनीय परिस्थिती आहे; शिवाय शिवोलीममध्ये पूर्ण रूग्णालयांसह योग्य आरोग्य व्यवस्थापनाचीही गरज आहे. या सर्व समस्या आम्हाला सोडवायच्या आहेत. यासाठी जनतेने कॉंग्रेस पक्षाला मतदान करून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT