अँथनी मिनेझिस: तुमच्या ग्रामबंधूला मते देऊन विधानसभेत पाठवा

तृणमूल काँग्रेसचे कळंगुटचे उमेदवार अँथनी मिनेझिस यांचे आवाहन
Anthony Menezes
Anthony MenezesDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: कळंगुट मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे लाट आली असून या लाटेत आपले विरोधक वाहून जातील आणि मोठ्या मताधिक्याने आपण विजयी होणार असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार अँथनी मिनेझिस यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आपण निवडून आल्यानंतर पीडीए रद्द करणार आहे. लोक कोणा एका पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहात नसून एक गोमंतकीय व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहात आहेत. त्यामुळे माझ्या कार्याकडे पाहून येथील मतदार मला पूर्ण पाठिंबा देतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Anthony Menezes
प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेवर गोव्यात छापा

तुमचा प्रचार कसा चाललाय?

उत्तर: सुरवातीपासूनच माझा प्रचार जोरात चालला आहे. माझ्या अपेक्षेहून अधिक मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे.

उमेदवारीसाठी तुम्ही तृणमूल काँग्रेस पक्षाचीच का निवड केली?

उमेदवारी मिळण्याआधी आम्ही तिघेजण बरोबर होतो. कोणालाही तिकीट मिळाले तरी चालेल म्हणून थांबलो होतो. आज आम्ही दोघेजण बरोबर आहोत. तिसरा म्हणजे जोसेफ सिक्वेरा आता भाजपचा उमेदवार आहे. आग्नेलो माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आम्हा दोघांची ताकद अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला आमच्या मतदारसंघातील लोकांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून सहज कळून येते की त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. याउलट विरोधी उमेदवार कसे वैफल्यग्रस्त बनले आहेत ते त्यांच्या चेहरऱ्यांवर पाहायला मिळते. त्यांच्या चेहऱ्यांवर भीती दिसते.

Anthony Menezes
शिवोलीत माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक विकास झाला: विनोद पालयेकर

तुम्हा प्रचार करत असताना तुमच्यासमोर लोकांनी कोणत्या समस्या मांडल्या?

अनेक लोकांनी आपले प्रश्‍न मोकळेपणाने मांडले. एका मतदाराने पीडीएबद्दल प्रश्‍न केला. कळंगुटमधील लोकांना पीडीए नको होती. पण ती झाली. यासंदर्भात जोसेफ सिक्वेरा यांचा सपशेल गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रकरण न्यायालय प्रविष्ट होते, पण सिक्वेरा म्हणतात हे प्रकरण मागे घेतले आहे. आपणावर हल्ला केल्याचा आरोप नाहक त्यांनी माझ्यावर केला आहे. त्यांची स्थिती आज खाज एकीकडे आणि खाजवतात भलतीकडेच अशी झाली आहे. तृणमूलने केलेले सर्वेक्षण आम्हाला मिळाला आहे आणि त्यानुसार मला भरभक्कम मताधिक्क्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपणच जिंकणार असे सर्वांनाच वाटत असते. मात्र, मी या निवडणुकीत उभा आहे तो फक्त जिंकण्यासाठीच.

तुम्ही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. लोकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळेल? हा पक्ष गोव्याबाहेरचा असे म्हटले जाते.

तृणमूल काँग्रेस बाहेरचा तर मग आतला पक्ष कोणता? तृणमूल काँग्रेस आणि मगोप यांची युती आहे. मगोप हा अस्सल गोव्याचा पक्ष आहे. मी स्वतः नीज गोंयकार आहे. लोक माझ्याकडे व्यक्ती म्हणून पाहतात.

Anthony Menezes
मयेत मगोप की गोवा फॉरवर्ड बाजी मारणार?

तृणमूलचा उमेदवार म्हणून मतदार स्वीकारतील काय?

अर्थातच. माझे काम पाहून नक्कीच मतदार मला कौल देतील. कळंगुट मतदारसंघात तृणमूलची लाट नव्हे, तर ही सुनामी ठरणार आहे. येथील लोक पक्षाकडे पाहत नाहीत, व्यक्तीकडे पाहतात. माझी कार्यशैली वेगळी आहे. त्यामुळे माझ्या वॉर्डमध्ये विद्यमान आमदाराने 100 मते घेऊन दाखवावीत.

लोकांना कोणता संदेश द्याल?

माझ्यावर विश्‍वास ठेवा. तुमचे प्रेम मला द्या. मी तुमच्याशी कधीच खोटारडेपणा करणार नाही. येत्या 14 तारखेस मोठ्या संख्येने बाहेर या आणि तुमच्या ग्रामबंधूला मते देऊन विधानसभेवर पाठवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com