Pollution in Goa
Pollution in Goa Dainik Gomantak
गोवा

Pollution in Goa: 'हे' आहे गोव्यातील सर्वात प्रदुषित ठिकाण...

Akshay Nirmale

Pollution in Goa: स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे राज्य देश-विदेशातील नागरिक पर्यटनासाठी गोव्याला प्राधान्य देत असतात. गोवा इतर राज्यांच्या तुलनेत स्वच्छ आणि सुंदर आहेच.

पण, सध्याच्या परिस्थितीत गोव्यातील कोणते ठिकाण सर्वाधिक प्रदुषित आहे, ते समोर आले आहे. आणि या ठिकाणाचे नाव वाचून धक्का बसू शकतो.

गोव्यातील सर्वात प्रदुषित ठिकाण दुसरे-तिसरे कोणतेही नसून गोव्याची राजधानी पणजी आहे. पणजीत गेल्या काही काळापासून स्मार्ट सिटी योजनेतील कामे सुरू आहेत. त्यामुळे पणजीत ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे.

अनेक ठिकाणी अनियोजितपणे ही खोदकामाची कामे सुरू असल्याचे दिसते. त्यातून पणजीत धुळीचे साम्राज्य पसरत आहे. त्यातून हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

शिवाय या कामांमुळे शहरात वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातूनही वायू प्रदुषणात भरच पडत आहे.

केंद्र सरकारच्या 2021 च्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. पणजी हे किनारपट्टीचे शहर आहे. त्यामुळे येथे समुद्री हवा येत असते. तरीही येथील हवा प्रदूषणाची पातळी चिंताजनक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी राज्यसभेत त्यांच्या उत्तरात वर्ष ही माहिती दिली.

2021 मधील देशातील 389 शहरांच्या वातावरणीय हवेच्या गुणवत्तेची स्थिती त्यांनी सादर केली. त्यात हवेतील पार्टिक्युलेट मॅटर 10 चे प्रमाण किती आहे, हे दर्शविले आहे. हे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आहे. पणजीच्या वातावरणात गोव्यात सर्वाधिक 73 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पार्टिक्युलेट मॅटर आहे.

हे प्रमाण 60 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर या सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. देशातील 389 शहरांमध्ये गोव्याची राजधानी पणजी 230 व्या क्रमांकावर आहे.

गोव्यातील इतर भागाचा विचार केला तर कुंकळीत हे प्रमाण 67, उसगाव-पाले 64, फोंडा 63, कोडली 62, कुंडई 62, तिलामोल 62, डिचोली 61 आणि होंडा येथे 61, सांगे 60, अमोना 59, मडगाव 59, तुये 59, वास्को 58, असनोडा 58 आणि म्हापसा येथे 57 असे प्रमाण आहे.

2021 मध्ये, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले होते की राजधानी पणजी आणि कुंडई मधील ग्रामीण भागासह राज्याच्या खाण पट्ट्यामध्ये प्रदूषणाने धोक्याची पातळी ओळांडली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार गोवा संवेदनशील गटांसाठी आरोग्यदायी नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT