Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: ...हा तर जंगल संपविण्याचा कट

काँग्रेस : दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा!

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात आगीच्या ज्या घटना सुरू आहेत, त्या काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. ज्या ठिकाणी दाट जंगले आहेत, अशा ठिकाणी आग लावून ती वनसंपदा संपविण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच विश्‍वजीत राणे यांच्याकडून वन खाते काढून घ्यावे आणि आगीच्या दुर्घटनांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही केली.

काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला सरचिटणीस कॅप्टन विरिएतो फर्नांडिस, मनीषा उसगावकर, राजेश वेर्णेकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा उपस्थित होते. विरिएतो म्हणाले, आम्ही या आगीच्या दुर्घटनांचा अभ्यास केला.

गुरुवारी 38 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमान नोंदले गेले. परंतु या तापमानात कधीही आग लागू शकत नाही. ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेमध्ये ज्या वनांना आग लागते, तेथील तापमान जास्त असते. माडाला गवत ठरवणारे हे सरकार पुढील भविष्यासाठी गोवा काय राखून ठेवणार?

ज्या ठिकाणची वनसंपदा टिकवायची आहे, ते सोडून मध्य प्रदेशात झाडे लावण्यासाठी सरकार जाते, हा काय प्रकार आहे? राज्यात अग्निकांड सुरू असताना केंद्र सरकार गप्प आहे, हे विशेष वाटते.

वाघेरी डोंगरावर प्रकल्प कसे?

मनीषा उसगावकर म्हणाल्या, ज्या ठिकाणी दाट जंगल आहे, त्याठिकाणी आग कशी लागते? वाघेरी डोंगरावर मोठे प्रकल्प कसे आले. त्याठिकाणी मशिनरी कशा पोहोचल्या. नगरविकास मंत्री चौकशी करण्याचे आदेश देतो म्हणतात, पण चौकशी केली जात नाही. आग का लागली, हे स्पष्ट झाले पाहिजे. मोठमोठ्या प्रकल्पांसाठी ही जागा साफ करण्यासाठीच हा प्रकार सुरू असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT