Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

हे सरकार भ्रष्टाचाराचं आणि दादागिरीचं; पालेकरांची भाजपवर खरमरीत टीका

'आप'ची गोव्याच्या जनतेला खरी गरज: अमित पालेकर

दैनिक गोमन्तक

Amit Palekar: आम आदमी पक्षातर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून अमित पालेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर पालेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील घोटाळे त्यांनी जनतेसमोर आणण्यास सुरुवात केली. नुकतेच पालेकर (Amit Palekar) यांनी एका खाजगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत आपली रोखठोक मतं व्यक्त केलीत. यादरम्यान त्यांनी भारतीय जनता पार्टीवर अनेक खरमरीत आरोप केले आहेत. (Amit Palekar Latest News Updates)

भाजप हे भ्रष्ट सरकार...

भारतीय जनता पार्टीने (BJP) आजवर फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळेच केले आहेत. जनतेचा विकास करण्यापेक्षा स्वतःचे खिसे भरण्यात त्यांना धन्यता वाटते. त्यांनी आजवर कोणतीही विकास काम न करता फक्त सत्ता उपभोगली आहे. जी कामं त्यांनी आधीच्या 5 वर्षात करणं अपेक्षित होतं, त्याच कामांसाठी आज ते पुन्हा लोकांकडे मतदान करण्याची विनंती करत आहेत. इथंच त्यांचा नसलेला विकास दिसून येतो.

काल अमित शहा (Amit Shah) गोव्यात आले. त्यांनी खूप मोठमोठ्या बाता केल्या. ते म्हणाले की, 'केंद्र सरकार नेहमीच गोवा राज्याला आर्थिक मदत करत असते.' पण मी म्हणतो की, प्रत्येक राज्याचा हा संविधानिक अधिकारच असतो की केंद्राने त्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मदत करणे. आम्हाला भीक नको आहे. आम्ही आमच्या हक्काचे मागत आहे. खरंतर गोव्याचं बजेट हे 21 हजार कोटींचं आहे. त्याचं या सरकारनं नेमकं काय केलंय? हे दाखवावं. त्या 21 हजार कोटींमध्ये त्यांनी नोकरभरती घोटाळा केला की फक्त स्वतःसाठी मोठे बंगले बांधले, हे जनतेला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच मी म्हणतो गोव्याचा सगळ्यात मोठा शत्रू भ्रष्टाचार हाच आहे. पाण्याची वाढीव बिलं आणि अजूनही अनेक सोयीसुविधा गोव्याच्या जनतेला मिळाली नसल्याची अनेक जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहेत.

याचंच एक उदाहरण म्हणजे, मी एका कॉन्ट्रॅक्टरला भेटलो, तर त्या ठिकाणचा रस्ता का नाही झाला, असं विचारल्यास त्यांने सांगितलं की, गेल्यावेळीच्या रस्ता बांधणीचंच बिल अजूनही मिळालेलं नाही.' म्हणजे आपण बघू शकतो की हे सरकार किती भ्रष्ट आहे.

अमित शहा कालच्या भाषणात म्हणाले होते की येत्या सहा महिन्यात आम्ही गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करू. पण मी म्हणतो, याच्या आधीपर्यंत हा व्यवसाय का सुरू झाला नाही? भाजपला कुणी रोखलं होतं का? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या कामाला एवढा उशीर का लागतो? म्हणजे निवडणूक आली की मगच हे पक्ष लोकांचा विकास करण्याची नाटकं करतात, असे रोखठोक आरोप अमित पालेकरांनी भाजपवर केले आहेत.

काँग्रेसच्या पक्षांतर आवर टोला

काँग्रेस (Congress) म्हणत आहे की आता गोव्याला काँग्रेसची गरज आहे काँग्रेसच गोव्याचा विकास साधू शकेल. पण ज्या पक्षाला स्वतःचे लोक वाचवण्यासाठी आणि आमदार वाचवण्यासाठी देवळात जाऊन शपथ घ्यावी लागते, तो पक्ष गोव्याचा विकास कसा साधणार.

'आप'ची गोव्याच्या जनतेला खरी गरज!

दिल्ली निवडणुकांच्या वेळेस 'आप'वर (AAP) टीका झाली होती की, पक्षाला कमी जागा मिळणार. पण तरीसुद्धा दिल्लीमध्ये 'आप'चं सरकार स्थापन झालं. असंच गोव्यातही आम्हाला बोललं जात आहे. हे नवे चेहरे आहेत, त्यांची नवी ओळख आहे. हे गोव्याचा विकास कसा करणार? पण आम्ही स्वतःला सिद्ध केलं आहे. आणि त्यामुळेच आम्हाला गोव्यातही जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे. फक्त जनतेसाठी काम करतो, असं म्हणून होत नाही. तर खरंच ती तळमळ मनात असावी लागते. हे नेते कधीच लोकांच्या घरात गेले नाहीत. पण गोव्यातील जनता किती त्रस्त आहे, हे आम्ही स्वतः पाहिलं आहे. त्यांचा त्रास आम्हाला दूर करायचा आहे. गोव्यात चांगलं स्थिर सरकार स्थापन करायचं आहे. गोव्यातल्या जनतेला उत्तम दर्जाचं दैनंदिन आयुष्य द्यायचं आहे. त्याचबरोबर गोव्यामध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या, आयटी कंपनी आणि इंडस्ट्रीज कशा आणायच्या हे आम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं कागदोपत्री करून आम्हाला गोव्यात सरकार स्थापन करायचं आहे. राज्यात नोकरी नाही म्हणून जे परदेशात आहेत, त्यांना परत गोव्यात आणायचं आहे.

गोव्यात अजूनही कचऱ्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. जे सरकार कचरा साफ करू शकत नाही, दैनंदिन जीवनातला मुद्दा नष्ट करू शकत नाही, ते सरकार विकास कसा साधणार? याचं उत्तर त्यांनी जनतेला देणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणत आहेत गोव्यातली जनता या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे 'कन्फ्युज' झाली आहे. पण मी म्हणतो की, जनता कन्फ्युज झाली नाही. गोव्याची जनता खूप हुशार आहे. फक्त जनता या सगळ्यांमध्ये पिचून गेली आहे. म्हणूनच जनतेला बदल हवा आहे, जो आम्ही आणणार आहोत. त्यामुळे जनतेला विनंती करतो की त्यांनी आता पूर्ण विचार करूनच आपलं महत्वाचं मतदान करायचं आहे. कारण या इतर पक्षांसाठी, भाजपासाठी मतदार राजा फक्त निवडणुकीच्या (Goa Elections 2022) दिवसापुरता असतो, पण आमच्यासाठी हा मतदारराजा नेहमीच राहणार आहे आणि तो असलाच पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT