Fisherman Struggle  Dainik Gomantak
गोवा

तिसरी राज्य मच्छीमार संघर्ष यात्रा केरळ येथे संपन्न

''आम्हाला सागरमाला प्रकल्प गोव्यात नको''

दैनिक गोमन्तक

वास्को: नॅशनल फिश वर्कर्स फोरमची तिसरी राज्य मच्छीमार संघर्ष यात्रा पार पडली. ही यात्रा केरळ येथील वलीयाथूरा तिरुवनन्तपुरम येथे संपन्न झाली. यावेळी फोरमतर्फे केरळ येथील बाधित गावाला भेट दिली. (Third State Fishermen Struggle Yatra held in Kerala)

विझिंजन आंतरराष्ट्रीय बंदराच्या ड्रेजिंगमुळे समुद्राच्या धूपामुळे 400 कुटुंबे विस्थापित झाली आहेत. एनएफएफचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमोस यांनी सांगितले की, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने केरळमधील बंदर विस्तार योजना तात्काळ थांबवाव्यात आणि राज्य सरकारने सागरमाला योजना रद्द न केल्यास केरळमध्ये मच्छिमारी लोकांची जी अवस्था झाली तशीच अवस्था गोव्यातील मच्छिमार आणि किनारपट्टीवरील रहिवाशांचाही तीच होईल ऑलेंन्सियो सिमॉईश म्हणाले.

केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने केरळमध्ये बंदर विस्तार योजना तात्काळ थांबवावी अशी मागणी करताना राज्य सरकारने सागरमाला योजना रद्द करावी अशीही मागणी केली. अन्यथा गोव्यातील मच्छिमारांची आणि किनारपट्टीवरील रहिवाशांचाीही तीच गत होईल, जी केरळ मधील लोकांची झाली आहे. असे नॅशनल फीशवर्कर्स फोरमचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमॉईश यांनी भिती व्यक्त केली आहे. समाजाचे नेते तथा काँग्रेसचे कार्यकर्ते सिमॉईश यांनी केरळ राज्यातून आलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे सदर मागणी केली आहे.

सागरमालासाठी बंदरांचा विस्तार केला जात असून, गोव्यातही मुरगाव बंदराचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. कोळसा वाहतुकीसाठी हे सगळे केले जात असून, या योजनेमुळे केरळ, गोवा व किनारपट्टी असलेल्या अन्य राज्यांत पर्यावरणाचा मोठा विध्वंस होणार आहे. तसेच लोकांना कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचाही सामना करावा लागेल. तसेच राज्यातील पर्यटनालाही या कोळसा प्रदूषणामुळे फटका बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने सागरमाला प्रकल्पासाठी केरळमधील किनारपट्टी भागांत राहणाऱ्या मच्छिमारांची घरे पाडून टाकली आहेत. त्यामूळे लोक ज्या ठिकाणी राहत होते. ती गावे सागरमाला प्रकल्पासाठी नांगर फिरवून उद्ध्वस्त करून टाकली आहेत. या जागेवर केंद्र सरकार गोव्यातही सागरमाला प्रकल्प उभारू पाहत असून, गोव्यातील मच्छिमारांचीही किनारपट्टीवरील घरे अशा प्रकारे या प्रकल्पासाठी पाडण्यात येणार असल्याने राज्य सरकारने आम्हाला हा प्रकल्प गोव्यात नको असे केंद्राला कळवावे,अशी मागणी सिमॉईश यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी मच्छिमार संघर्ष समितीची राज्यात दि. 16 व दि. 17 जून रोजी यात्रा होणार असल्याचे सिमोईश यांनी सांगितले. मच्छिमार संघर्ष समितीची केरळ येथील यात्रा नुकतीच संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या यात्रेत मच्छिमारी समाजाचे देशभरातील नेते सहभागी झाले असल्याची माहिती सिमॉईश यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT