Third Janata Darbar At Baina Vasco Dainik Gomantak
गोवा

Janta Darbar: वास्‍कोतील जनता दरबारात मंत्री सुदिन ढवळीकर निरुत्तर

कोळशापासून मुक्तता मिळेल का?

दैनिक गोमन्तक

Third Janata Darbar At Baina Vasco: येथील रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात सोमवारी आयोजित जनता दरबाराकडे जनतेने पाठ फिरवल्याचे पाहावयास मिळाले. सभागृहात लोकांपेक्षा अधिकारी वर्गाचीच जास्त गर्दी होती.

केवळ ३१ जणांनीच या जनता दरबारात नोंदणी केली होती. त्यामुळे मंत्री शिरोडकरांसह आमदारही नाराज झाल्याचे दिसून आले.

दुसरीकडे वास्‍कोतील जनता दरबारात मंत्री सुदिन ढवळीकर यांना ‘कोळशापासून मुक्तता मिळेल का’, असा स्‍थानिकांनी सवाल केला. त्‍यावर सुदिन निरुत्तर झाले.

कोणत्याही स्थितीत मुरगाव बंदरात होणारी कोळसा हाताळणी बंद करा. हवे तर मी, तुम्हाला जनता दरबारात साष्टांग दंडवत घालतो, अशी आर्त विनवणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना रवींद्र भवन, बायणा येथे झालेल्या जनता दरबारात केली.

मंत्री ढवळीकर यावर निरुत्तर झाले. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर देण्याचे सुनावले. त्यावर ‘प्रदूषण’ चे अधिकारीही कोळसा कमी प्रमाणात हाताळला जात असल्याचे सांगू लागले.

साखळीत लोकांपेक्षा अधिकारी जास्‍त

साखळी येथील जनता दरबाराला कमी उपस्‍थिती असल्‍याने मंत्री सुभाष शिरोडकर म्‍हणाले, ही बाब योग्य नव्हे. याची कारणे अनेक असू शकतात. आम्ही गोवेकर सुशेगाद. त्यामुळे काहीजण आलेले नसावेत.

आवश्यक व महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भागाची प्रगती कधी होऊ शकत नाही. या जनता दरबाराचा प्रसार करण्याची जबाबदारी ही पंचसदस्य व सरकारी अधिकाऱ्यांची आहे. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही खंत व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT