Mardol Police Station  Dainik Gomantak
गोवा

Mardol Police Station: 6 महिन्यांत म्हार्दोळ पोलिस स्थानकावर तिसरा निरीक्षक

Mardol Police Station: बरोब्बर सहा महिन्यांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकाला आता तिसरा पोलिस निरीक्षक लाभला आहे.

दैनिक गोमन्तक

Mardol Police Station: बरोब्बर सहा महिन्यांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकाला आता तिसरा पोलिस निरीक्षक लाभला आहे. गेल्या 8 जूनला म्हार्दोळ येथील पोलिस स्थानकाचे उद्घाटन झाले होते, आता या पोलिस स्थानकावर तिसरा पोलिस निरीक्षक येणार असून त्यासंबंधीचा आदेश पोलिस प्रशासनाने काढला आहे.

फोंडा तालुक्यावर पडणारा ताण कमी करण्यासाठी म्हार्दोळ पोलिस स्थानकाची निर्मिती करण्यात आली. प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नांमुळे फोंडा तालुक्यातील हे दुसरे पोलिस स्थानक कार्यरत झाले.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी या पोलिस स्थानकाचे गेल्या 8 जूनला उद्घाटन केले. पण सुरुवातीचा आठवडा निवांत गेल्यानंतर या पोलिस स्थानकावर अपघात, खून, चोऱ्या, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडतच राहिल्या.

बाणस्तारी येथील मर्सिडिझ कारगाडीने ठोकरल्याने तिघाजणांचा बळी गेला होता. हे प्रकरण हाताळताना तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांची तारांबळ उडाली.

लोकांनी हे अपघाताचे प्रकरण लावून धरले. त्यामुळे शेवटी मोहन गावडे यांची उचलबांगडी करण्यात आली. मोहन गावडे यांच्या जागी सतीश गावडे यांची नियुक्ती झाली तर आता सतीश गावडे यांची बदली करून राघोबा कामत यांच्याकडे ताबा देण्यात आला आहे.

आज (शनिवारी) तशा प्रकारचा आदेश पोलिस प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे सहा महिन्यात तिसरा पोलिस निरीक्षक म्हार्दोळ पोलिस स्थानकावर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT