MLA Michael Lobo restaurant theft Dainik Gomantak
गोवा

चोरट्यांनी आमदारालाही नाही सोडले, मायकल लोबो यांच्या रेस्टॉरंटमध्ये चोरी; रोकड लंपास

Goa Theft Case: हणजूण येथील “पिस्को – बाय दी बीच” या रेस्टॉरंटमध्ये चोरी झाली आहे. रेस्टॉरंट आमदार मायकल लोबो यांच्या मालकीचे आहे.

Pramod Yadav

म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोड्याचे प्रकरण गाजत असताना चोरट्यांनी आता आमदाराच्या रेस्टॉरंटला लक्ष्य केले आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या हणजूण येथील रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी रेस्टॉरंटमधून रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण येथील “पिस्को – बाय दी बीच” या रेस्टॉरंटमध्ये चोरी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी ही चोरी झाल्याचे सांगितले जात आहे. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिस्को रेस्टॉरंट आमदार मायकल लोबो यांच्या मालकीचे आहे. चोरट्यांनी किती रुपयांची चोरी केलीय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

म्हापसा येथे सशस्त्र टोळीच्या घातलेल्या दरोड्यांनंतर स्थानिक आक्रमक झाले असून, पोलिस आणि सरकारला प्रश्न विचारला जात आहे. डॉ. घाणेकर यांच्या घरावर घातलेल्या या दरोड्यात रोख रक्कम, मौल्यवान वस्तू असा मिळून ३५ लाखांचा ऐवज चोरी करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी आता तिघांना अटक केली आहे.

दरम्यान, गोव्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. रात्रीच्या सुमारास अशा घटना घडत असल्याचे रहिवासी सोसायटी आणि वस्तींमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT