Bengaluru Police Arrest Dainik Gomantak
गोवा

Karnataka: 'ते हिंदूंचा द्वेष करतात', काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट करणाऱ्या 'मुंबईच्या डॉन'ला गोव्यातून अटक

Bengaluru Police: धार्मिक दंगे होण्याची शक्यतेचा आरोप करत एका काँग्रेस कार्यकर्त्याने त्याच्याविरोधात बंगळुरु पोलिसांत तक्रार दाखल केली.

Pramod Yadav

Bengaluru Police

कर्नाटक काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्या विनीत नाईकला बंगळुरु पोलिसांनी गोव्यातून अटक केलीय. विनीत मुंबईचा डॉन (भिकू म्हात्रे) या नावाने एक्स हँडल चालवतो. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

विनीत नाईक हा भाजप समर्थक असून, त्याने अनेक पोस्ट सोशल मिडिया हँडल एक्सवर पोस्ट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने कर्नाटक काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट केली यामुळे धार्मिक दंगे होण्याची शक्यतेचा आरोप करत एका काँग्रेस कार्यकर्त्याने त्याच्याविरोधात बंगळुरु पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलसांनी गुन्हा नोंद करत त्याला अटक केलीय.

काँग्रेसला हिंदूंकडून संपत्ती काढून घेऊन ती मुस्लिमांना वाटायचीय. कारण काँग्रेस हिंदूंचा द्वेष करतात, अशी पोस्ट नाईकने एक्सवर केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे, सध्या ही पोस्ट एक्सवरुन हटविण्यात आली आहे.

भाजपने या अटकेवरुन कर्नाटकच्या काँग्रेस सरकावर टीका केली आहे. काँग्रेसचा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, तसेच भाजप भिकू म्हात्रे व त्याच्या परिवारासोबत असून कायदेशीर लढा दिला जाईल, असे भाजप आयटी सेलचे अमित मालविय म्हणाले.

यासह तेजस्वी सूर्या यांनी देखील विनीत नाईक यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील विनीतच्या अटकेचा निषेध करत, काँग्रेसचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला निंदनीय आणि धोकादायक आहे, असे तावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

SCROLL FOR NEXT