Mormugoa Port: खवळलेल्या समुद्रात बोटीचे इंधन संपले; मुरगावजवळ 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांना जीवदान

Indian Coast Guard Rescue: भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सर्व पर्यटक आणि क्रू सदस्यांना सुरखरुप बोटीतून बाहेर काढत किनाऱ्यावर घेऊन आले.
Indian Coast Guard Rescue
Indian Coast Guard RescueDainik Gomantak

Indian Coast Guard Rescue

खराब हवामान आणि समुद्रात पर्यटकांना घेऊन गेलेली बोट इंधन संपल्याने अडकून पडली. भारतीय तटरक्षक दलाने बोटीत अडकून पडलेल्या 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांची सुखरुप बाहेर काढले. रविवारी (दि.19) ही घटना घडली.

पर्यटक बोट 2 क्रू सदस्य आणि 24 पर्यटकांना घेऊन समुद्रसफारीसाठी गेली होती. नेरुळ पॅराडाईज जवळ आल्यानंतर बोटीतील इंधन संपले दरम्यान, हवामान देखील खराब असल्याने बोटीतील सर्व पर्यटक जीव मुठीत घेऊन बसले होते. बराचकाळ बोटीत अडकून पडलेल्या पर्यटकांच्या मदतीला अखेर भारतीय तटरक्षक दलाचे जवान धावून आले.

भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सर्व पर्यटक आणि क्रू सदस्यांना सुरखरुप बोटीतून बाहेर काढत किनाऱ्यावर घेऊन आले.

वाचविण्यात आलेल्या सर्वांना प्राथमिक उपचार देण्यात आले शिवाय आवश्यक वैद्यकीय उपचारांची तजवीज करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com