AAP MLA Cruz Silva Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, दिल्लीत धोका दिला, यापुढे सहकार्य नाही; गोव्यातील आप आमदारांनी स्पष्ट केली भूमिका

Goa Politics: यापूर्वी काँग्रेस आमदारांनी पक्षांतर करुन जनतेला फसवले त्यामुळे नैतिकता नसलेल्या पक्षासोबत आम्हाला काम करायचे नाही.

Pramod Yadav

पणजी: काँग्रेसने आम्हाला दिल्लीत धोका दिला. दिल्लीच्या अध्यक्षांनी याची जाहीर कबुली दिली असून, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे यापुढे त्यांना कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका आप आमदार क्रूझ सिल्वा आणि व्हेंझी व्हिएगस यांनी गुरुवारी (२५ सप्टेंबर) स्पष्ट केली.

पर्वरीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत क्रूझ सिल्वा बोलत होते. यावेळी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते. सभापतीपदाचे उमेदवार एल्टन डिकॉस्ता यांना पाठिंबा देण्याचे आम्ही जाहीर केले होते, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी मतदान केले पण, यापुढे त्यांना सहकार्य करणार नाही, असे सिल्वा यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसमध्ये नैतिकताच शिल्लक नसल्याचे सिल्वा म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष इंडी आघाडीसोबत होता. विधानसभा निवडणुकीतही आपने काँग्रेसला सहकार्य केले पण, काँग्रेसने आपच्या पाठीत खंजीर खुपसला.

दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला धोका दिल्याची कबुली काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष व्हिडिओतून देत आहे. याचा निषेध म्हणून गोव्यात यापुढे काँग्रेसला सहकार्य करणार नसल्याचे आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले.

यापूर्वी काँग्रेस आमदारांनी पक्षांतर करुन जनतेला फसवले त्यामुळे नैतिकता नसलेल्या पक्षासोबत आम्हाला काम करायचे नाही. आम्हाला जनतेसाठी गांभीर्याने काम करायचे आहे, असेही सिल्वा म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून, याविरोधात आप लवकरच गुंडिगिरी कँम्पेन सुरु करणार असल्याचेही व्हिएगस यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी देखील दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी यांनी काँग्रेससोबत युती करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनीही काँग्रेसला विश्वासघातकी म्हणत आगामी विधानसभेत स्वबळावर लढण्याचे भाष्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT