Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'ते' म्हणजे कॉपी मास्टर: प्रमोद सावंत

सत्ताधारी भाजप (BJP) आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्यासाठी राज्यात अनेक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यापैकी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) देखील सत्तेसाठी प्रमुख दावेदार आहे. राजकीय पक्षांकडून राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली जात आहेत. या मालिकेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सुध्दा आश्वासनाच्या रांगेमध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी गोव्यातील जनतेला एक वचन दिले आहे की, ज्यावरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

खरे तर, अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक जिंकल्यास राज्यात मोफत तीर्थयात्रा करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याचे वर्णन मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांच्याच सरकारने राबवलेली योजना म्हणून केले आहे. याबाबत सावंत म्हणाले, 'मी माझ्या अर्थसंकल्पात ही योजना (विनामूल्य तीर्थयात्रा) जाहीर करत अधिसूचीतही केली होती. तसेच त्याची नोंदणीही सुरु झाली आहे. ते ( Kejriwal) माझ्या योजनेची कॉपी करत आहेत. त्यांना योजना कॉपी करण्याची सवयच झाली आहे. ते 'कॉपी मास्टर' आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT