Kadamba Transport Corporation Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport Corporation: ‘माझी बस' योजनेवर खासगी बस मालक संघटनेने उपस्थित केले 'हे' प्रश्न; म्हणाले, या योजनेत आम्ही...

सुदीप ताम्हणकर: सहा महिन्यांनंतर वाऱ्यावर सोडण्याची भीती

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Transport Corporation खासगी बसधारकांना कदंब महामंडळ ‘माझी बस'' या योजनेखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु सहा महिने ही योजना सुरू राहील आणि त्यानंतर ते खासगी बसधारकांना वाऱ्यावर सोडून देतील.

त्यामुळे या योजनेत आम्ही बसधारकांना सहभागी होऊ देणार नाही, असे सांगत गोवा खासगी बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या निविदेवर प्रश्‍न उपस्थित केला.

ताम्हणकर यांनी शनिवारी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेतली, ते म्हणाले, इलेक्ट्रिक बस चालकांनी केलेल्या संपामुळे त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. कारण कदंबा महामंडळाकडे जेव्हा हे चालक समस्या मांडण्यास गेले, तेव्हा त्यांनी तुमच्या कंपनीचा तो प्रश्‍न असल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्ही ट्रान्सलेन या कंपनीकडून कदंबाने भाड्याने बसेस घेतल्या आहेत. आम्ही चालकाला प्रति दिन एक हजार रुपये आणि जेवणाचे 40रुपये देतो. परंतु या कंपनीकडे गेलेल्या स्थानिक चालकांना त्याहीपेक्षा १६ ते १६ हजार रुपयांमध्ये पगारावर काम करावे लागत आहे.

आमच्याकडे ईव्हीचे चालक विषय घेऊन आले होते, पण आम्हांला विचारून त्यांनी काम स्वीकारले होते काय? आरजीवाल्यांनी त्यांना का पाठिंबा दिला हे काही कळत नाही.

ताम्हणकर म्हणाले, या ईव्ही बसेसचा मेंटनन्स पाहण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) माध्यमातून व्हावे, असे जीटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांना वाटले. त्यामुळे आता जीटीडीसी गॅरेज उभे करणार आहे.

या इलेक्ट्रिक बसेसचा मेन्टनन्स पाहण्यासाठी देसाई यांनी एक निविदाही काढली. याची कल्पना आपणास आल्याने आम्ही एका दिवसात 30 माहिती अधिकारानुसार अर्ज जीटीडीसीला सादर केले. त्यामुळे देसाई यांनी ही निविदा प्रक्रिया थांबविली.

त्यानंतर देसाई यांची बदली होताच, कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी जीटीडीसीतील कोणाशी हाताला धरले. त्यामुळे पुन्हा निविदा निघाली स्मार्ट सिटीच्या नावे बसेस घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.

त्या निविदेनुसार पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (PMI Electro Mobility Solutions Private Limited) या कंपनीला 34 कोटी 34 लाख 82 हजारांची निविदा मिळाली. परंतु निविदा केव्हा काढली याची माहिती माहिती अधिकाराखाली आम्हांला मिळालेली नाही, असे ताम्हणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rakhi 2025 Lucky Colors: रक्षाबंधन विशेष, राशीनुसार कपड्यांचे आणि राखीचे कोणते रंग शुभ आहेत? जाणून घ्या

Nagpanchami 2025: संपूर्ण गोव्यात नागपंचमी उत्साहात साजरी

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

IND vs ENG: फक्त 'इतकं' करा आणि 2 विक्रम मोडा! ओव्हलमध्ये घडणार मोठा करिष्मा; भारत-इंग्लंड मिळून मोडणार 70 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT