Water Problem Dainik Gomantak
गोवा

Water Problem: बार्देशमध्ये आज दिवसभर होणार मर्यादित पाणीपुरवठा

दैनिक गोमन्तक

Water Problem: म्हापसा-पणजी महामार्गावरील गिरी सर्व्हिस रस्त्यावरील असलेल्या ५००एमएम जलवाहिनीच्या आंतरजोडणीचे काम बुधवारी (ता.१३) हाती घेतले जाणार असल्याने बार्देशमधील थिवी, शिवोली, साळगाव तसेच कळंगुटमधील काही भागांमध्ये बुधवारी दिवसभर मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे साबांखाने सांगितले.

या आंतरजोडणीचे कामामुळे बुधवारी बार्देश तालुक्यातील थिवी (काही भाग), आकय, हणजूण, शापोरा, वागातोर, सांगोल्डा (काही भाग), नागवा, ग्रॅण्ड मरोड, पर्रा, हडफडे व कळंगुटमधील काही भागांत मर्यादित पाणीपुरवठा राहिल.

उपलब्ध माहितीनुसार, गिरी येथील सर्व्हिस रस्त्यावरील भूमिगत ५००एमएमची जलवाहिनी ही आता रस्त्याच्या बाजूस शिफ्ट केली आहे. हे अंतर ३००मीटर इतके आहे. ही जलवाहिनी सर्व्हिस रस्त्यावर बरीच खोल भूमिगत असल्याने वाहतूकीच्या दबावामुळे सदर वाहिनीस वारंवार गळती लागायची.

त्यामुळेच ही वाहिनी रस्त्याच्या बाजूला घेतली असून, या वाहिनीच्या आंतरजोडणीचे काम बुधवारी पहाटे ५च्या सुमारास हाती घेतले जाईल. या कामासाठी पहाटे ३च्या सुमारास पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

महामार्ग रुंदीकरणावेळी या ठिकाणी सर्व्हिस रस्ता बांधला गेला. या सर्व्हिस रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव वापरलेला. त्यामुळे ही जलवाहिनी बरीच खोल भूमिगत गेलेली.

त्यानुसार, रस्त्याखाली असलेल्या या जलवाहिनीवरुन म्हापशाच्या दिशेने येणारी वाहने जात असल्याने या वाहिनीवर सातत्याने दबाव पडून पुन्हा-पुन्हा या वाहिनीस गळती लागण्याचे प्रकार घडायचे. मध्यंतरी, अनेकवेळा साबांखाने या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

फक्त जोडणी बाकी असून 500 एमएम जलवाहिनीच्या आंतरजोडणीचे काम आज बुधवारी पहाटे हाती घेतले जाणार. तर, सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण करुन पाणीपुरवठा पूर्ववत करणार, असे साबांखा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT