पणजीत 08 ते 11 डिसेंबर या कालावधीत नववी जागतिक आयुर्वेद काँग्रेस (9th Ayurveda Congress, Goa) पार पडली. या परिषदेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावून उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान, या आयुर्वेद काँग्रेसमध्ये अवैध गोष्टी घडल्याचा आरोप काँग्रेसने (Goa Congress) केला आहे. या परिषदेत अमली पदार्थाचा स्टॉल असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे.
सोमवारी (दि.12) गोवा काँग्रेसच्या (GPCC) वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा, श्रीनिवास खलप आणि इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. यावेळी मोपा विमानतळाचे नामकरण आणि आयुर्वेद काँग्रेसवरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला.
जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये चक्क गांजाचा स्टॉल लावण्यात आला होता. 750mg गोळीत 200mg गांजा असून त्याची विक्री काउंटरवर केली जात आहे. तसेच, यासाठी डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन देखील पाहिली जात नाही. दहा गोळ्याचे पाकिट 159 रूपयांना विकले जात होते. आयुर्वेदाच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध कामे बंद करा असे काँग्रेस नेते श्रीनिवास खलप म्हणाले.
नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये चक्क गांजाचा स्टॉल लावण्यात आला होता, असा आरोप अमित पाटकर यांनी केला. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे. सरकारमान्य कार्यक्रमांमध्ये बंदी असलेल्या अमलीपदार्थाचा स्टॉल असणे बेकायदा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये 40 ते 50 देश सहभागी झाले होते. या जागतिक परिषदेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित पार पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.