ponda Congress Dainik Gomantak
गोवा

Ponda News : फोंडा तालुक्‍यात काँग्रेसच्‍या मतांमध्‍ये झाली भरीव वाढ; मगोशी युती असूनही भाजप ‘नापास’

Ponda News : शिरोड्यात काँग्रेसला गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त १९५३ मते पडली होती आणि त्यांना पाचवे स्थान मिळाले होते. पण लोकसभा निवडणुकीत या पक्षाला ७५३९ तर मिळाली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, लोकसभा निवडणुकीच्‍या दक्षिण गोवा मतदारसंघातील निकाल अजूनही लोकांमध्‍ये एक चर्चेचा विषय ठरला आहे. फोंडा तालुक्यातील तिन्ही मतदारसंघांचा विचार केल्यास भाजपला अपेक्षित आघाडी मिळू शकली नाही एवढे निश्‍चित. यावेळी मगोशी युती असल्यामुळे भाजपला मोठ्या आघाडीची अपेक्षा होती. पण ती पूर्णत्वाने फलद्रूप होऊ शकली नाही.

फोंडा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजप व मगोच्या मतांची एकत्रित बेरीज १५ हजारांच्या घरात पोहोचते. त्यात अपक्ष संदीप खांडेपारकरांची मते मिळवल्यास ती संख्‍या १६ हजारांच्‍या पार जाते. तरीसुद्धा यावेळी भाजपला पडली १४,१८९ मते. दुसरीकडे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळाली होती ६८४० मते. पण आता लोकसभा निवडणुकीत त्‍या पक्षाला प्राप्त झाली आहेत ८५९१ मते. म्‍हणजेच यावेळी काँग्रेसच्या मतांमध्‍ये तब्बल १७०० एवढी वाढ झाली आहे.

मडकईत मतदारसंघातही हीच स्थिती आहे. गेल्या वेळी मडकईत काँग्रेसचे उमेदवार लवू मामलेदार यांना फक्त १०९० मते प्राप्त झाली होती. पण यावेळी काँग्रेसला ३९७४ मते मिळाली. म्हणजे तेथे काँग्रेसच्या मतांत तीनपट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मडकईत काँग्रेसची योग्य बांधणी नसतानाही एवढी मते कशी काय प्राप्त झाली याचे विश्‍लेषण करण्यात राजकीयतज्ज्ञ सध्या मग्न आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत सुदिन ढवळीकर यांना १३,९७३ व भाजपचे सुदेश भिंगी यांना ४००० मते मिळाली होती. दोघांची बेरीज होते जवळजवळ १८०००. पण यावेळी भाजपला फक्त १४००० मते मिळू शकली म्हणजे तूट पडली जवळजवळ ४००० मतांची. आता हा फरक मगो का भाजपमुळे पडला, याबाबत राजकीय विश्‍‍लेषक अभ्‍यास करत आहेत.

शिरोड्यात काँग्रेसला गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त १९५३ मते पडली होती आणि त्यांना पाचवे स्थान मिळाले होते. पण लोकसभा निवडणुकीत या पक्षाला ७५३९ तर मिळाली आहेत. भाजपने १२,५२४ मते पटकावली. वास्तविक गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास शिरोड्यात भाजपचे सुभाष शिरोडकर यांना ८३०६ तर मगोचे संकेत मुळे यांना २३९७ मते मिळाली होती. यांची बेरीज केल्यास ती जवळजवळ ११०००च्या आसपास होते.

मडकई, शिरोड्यात भ्रमाचा भोपळा फुटला

एकंदरीत विचार करता यावेळी फोंडा तालुक्‍यातील तिन्ही मतदारसंघात काँग्रेसने अनपेक्षितपणे चांगली मते प्राप्त केली आहेत. त्‍यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. कारण ही मतेच भविष्यात भाजपला आव्हान देऊ शकतात असे मत राजकीयतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे मडकई व शिरोड्यात काँग्रेसला कोणी वाली नसतानाही त्‍या पक्षाने चांगली मते प्राप्त केली आहेत. यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजप अपेक्षित अशी आघाडी घेऊ शकला नाही आणि भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या पराभवाच्‍या अनेक कारणांपैकी हेसुद्धा एक कारण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

Goa Accident: कानात इअरफोन लावून चालला रुळावरून, रेल्वेने दिली धडक; झारखंडच्या तरुणाचा सांकवाळ येथे मृत्यू

Rashi Bhavishya 15 July 2025: कामातील प्रगती स्पष्ट जाणवेल, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT