Women Burn in Aldona Dainik Gomantak
गोवा

तेल समजून ओतले पेट्रोल; पणती लावताना झाला भडका अन् महिला होरपळली

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू

Kavya Powar

Aldona Fire News: हळदोण्यातील रामतळे येथे सोमवारी साईबाबांची पालखी घरोघरी जात असताना दिक्षिता नाईक या 32 वर्षीय महिलेसोबत एक अपघात घडला. पालखीसाठी पणत्या पेटवत असताना भडका होऊन विवाहिता जखमी झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 32 वर्षीय दिक्षिता नाईक या पणत्या पेटवत होत्या. तेव्हा त्यांनी त्यामध्ये तेलाऐवजी चुकून पेट्रोल ओतले. खरेतर ही पेट्रोलची बॉटल नवऱ्याने आणून ठेवली. त्यावेळी दिक्षिता यांनी ते तेल समजून पणत्यांमध्ये ओतण्यास सुरुवात केली.

यावेळी पेट्रोलचा भडका झाला आणि त्यांच्या हातात असलेली पेट्रोलची बॉटल त्यांच्या अंगावर उसळली. यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या. हा सर्व प्रकार घडताच आजूबाजूच्या लोकांनी आणि त्यांच्या नवऱ्याने त्यांना त्वरित गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.

त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्या 70 टक्के भाजल्या आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनातील 'पाय तियात्रिस्‍त' सभागृह पुन्हा खुले, दुरुस्‍तीवर सव्वादोन कोटी खर्च; मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

IND vs AUS: चौथ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा रचणार इतिहास, कोहलीच्या 'विराट' विक्रमाची बरोबरी करणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT