Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: धर्मनिरपेक्ष देशात जातीयवादी राजकारणाला थारा नाही

‘म्हादई’च्या प्रश्र्नास प्राधान्य द्यावे- सरदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

धर्मनिरपेक्ष देशात जातीयवादी व फुटीरतावादी राजकारणाला थारा नाही, हे कर्नाटकातील मतदारांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यानी कर्नाटकातील विधानसभा निकालावर दिली.

कर्नाटकातील मतदारांनी स्थानिक प्रश्र्नांना जास्त महत्त्व देताना विसंगती व मतभेदाच्या राजकारणाला बाजूला सारले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री व गोव्यातील भाजपच्या इतर नेत्यांनी कर्नाटकात जाऊन प्रचार केला खरा; पण त्याचा तेथील मतदारांवर काहीच परिणाम झालेला नाही, हे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी आता गोव्यापुढे असलेल्या म्हादई नदीचा प्रश्र्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.

गोमंतकीयांची फसवणूक करून म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घेण्यासाठी गोवा सरकार जर प्रामाणिक व रचनात्मक प्रयत्न करीत असेल तर गोवा फॉरवर्ड पक्ष सरकारच्या पाठीशी उभा राहील.

- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT