Goa Covid-19 Guidelines Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19 Guidelines: गोव्यात नाईट कर्फ्यू नाही, पण...

मुख्यमंत्र्यानी गोव्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) होणार नसल्याचे सांगितले आहे. पण सरकारतर्फे दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास राज्य प्रशासन, गोवा पोलिस आणि आरोग्य प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

Kavya Powar

Goa Covid-19 Guidelines: सध्या कोरोना विषाणूचा गोव्यात खूप जास्त प्रमाणात फैलाव सुरू आहे. मागील काही दिवसात कोरोना (Corona) रुग्णसंख्येने कहर केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात अनेक स्तरावरून नाईट कर्फ्यूची (Night Curfew) मागणी करण्यात आली होती. पण मुख्यमंत्र्यानी गोव्यात नाईट कर्फ्यू होणार नसल्याचे सांगितले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी नागरिकांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. गोव्यात नाईट कर्फ्यू लागू केला नसला तरी नागरिकांसाठी काही निर्बंध लागू केले आहेत, आणि त्यांचे पालन करणे गोव्यातील प्रत्येकासाठी बंधनकारक असणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. सरकारतर्फे दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास राज्य प्रशासन, गोवा पोलिस (Goa Police) आणि आरोग्य प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

असे असतील नियम..

  • मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई

  • नाईट कर्फ्यू नसला तरी सार्वजनिक ठिकाणी (पार्टी, सभा, कार्यक्रम, मेळावे) 100 लोकांच्याच उपस्थितीला परवानगी

  • बंदिस्त ठिकाणी एकूण जागेच्या 50% उपस्थितीला परवानगी

  • समुद्रकिनांऱ्यावर गर्दी करण्यास मनाई

  • सर्व ठिकाणी गोवा पोलिसांची निगराणी

  • नियमांचे उल्लंघन केल्यास गोवा पोलिसांकडून कारवाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT