Goa Water News | Mhadai River Dainik Gomantak
गोवा

Mhadai Water Dispute : म्हादई जल क्षेत्रात कर्नाटकच्या हालचाली नाहीत

राजेंद्र केरकर यांची माहिती; गेल्या आठवड्यात कळसा, हलतरा परिसरात केली होती पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Mhadai Water Dispute : म्हदई जलतंटा प्रकरण हे सध्या न्यायप्रविष्ट असून बांधकाम करण्यासाठी कर्नाटककडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही. गेल्या आठवड्यात या परिसराची पाहणी केली होती, तेव्हा त्यात काही संशयास्पद आढळून आले नाही, अशी माहिती पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

पाणी वळवण्यासाठी कळसा आणि हलतरा या उपनद्यांवर बांधकाम करण्यासाठी कर्नाटकाकडून सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. परंतु बांधकामासाठी केंद्रीय जल आयोगाची परवानगी लागणार आहे. आयोगाला त्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. मात्र त्यांचे प्रयत्न पूर्ण होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कळसाचे पाणी वळवण्यासाठी अगोदरच कणकुंबी येथे अगोदर बांधकाम करून ठेवले आहे, असे केरकर यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांनी म्हादई जल लवादाने दिलेल्या निवाड्याला आव्हान दिले असून यावर लवकरच सुनावणी होणार आहे. तसेच या काळात येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही, यासाठी आम्ही पाहणी करत आहोत. कर्नाटकाच्‍या हालचालींवरसुद्धा आमचे बारीक लक्ष आहे, असे केरकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने म्हादई जल लवादाला आपला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या वर्षी 20 ऑगस्ट रोजी लवादाच्या विनंतीवरून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचा आदेश संबंधित राज्यांना देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT