Navratri 2022 : अष्टपैलू पोलीस उपनिरीक्षक सपना गावस

‘कोविड’वेळी जनतेला दिला आधार, गायनातून केली जागृती
Sapna Gawas
Sapna GawasDainik Gomantak
Published on
Updated on

Navratri 2022 : जगात तसेच देशात कोविड संक्रमणाची लाट आली होती. त्यावेळी लोकांना महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेरही पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते, अशावेळी लोकांना संध्याकाळच्यावेळी विरंगुळा म्हणून तसेच कोविडपासून दूर राहण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती स्वतः लिहून आपल्या मधुर आवाजातून - कोकणी गीतांतून लोकांपर्यंत पोचवणाऱ्या तसेच लोकांचे मनोरंजन करणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस हे नाव गोव्यात लोकांच्या परिचयाचे झाले आहे.

कोविड संक्रमणाचे प्रमाण वाढत असतानाही वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना घराबाहेर न पडण्याची गाण्यांमधून उपदेश करणाऱ्या सपना या कोविड बाधित झाल्या, मात्र त्यातून बरे होऊनही पुन्हा रस्त्यावर उतरून पुन्हा त्याच धाडसीवृत्तीने आपले हे काम सुरूच ठेवले.

मूळच्या गावात - नादोडा (बार्देश) येथील महिला उपनिरीक्षक सपना दिगंबर गावस यांच्या घरामध्ये पोलिस वातावरण होते. आजोबा, वडील व काका हे पोलिस खात्यात असल्याने त्यांना लहानपासूनच पोलिसाचे आकर्षण होते. कधी वडिलांबरोबर त्या पोलिस ड्रील पाहायला जात होत्या. त्यामुळे त्यांनी शालेय व कॉलेज शिक्षण घेताना पोलिस अधिकारी होण्याचे ध्येय मनाशी बाळगले होते. तिने मोठे पोलिस अधिकारी व्हावे, असे आईवडिलांचे स्वप्न होते. मात्र त्या पोलिस उपनिरीक्षक होण्यापूर्वीच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. बी. कॉम. पदवी घेतल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पद नोकरभरती होत नसल्याने पोलिस कामात फायदेशीर होईल, म्हणून तिने एलएलबीचे शिक्षण घेतले. तिने वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द मनात बाळगून ते साध्य केले. त्याला आईचा पाठिंबा व प्रोत्साहन त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरले. पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सध्या त्या पणजी पोलिस स्थानकात महिला उपनिरीक्षक म्हणून सेवा करत आहेत.

Sapna Gawas
Navratri 2022 : महिलांबाबतच्‍या गुन्ह्यांप्रती सदाच सतर्क राहणाऱ्या करिश्मा प्रभू

2013 मध्ये आयआरबी उपनिरीक्षक प्रशिक्षण नांदेड - महाराष्ट्र येथे सीआरपीए प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणासाठी इतर राज्यातील मिळून 244 पुरुष तर त्या एकट्याच महिला होत्या. मात्र या बॅचमधून त्यांना सर्वोत्कृष्ट बंदूक नेमबाज, सर्वोत्कृष्ट कामगिरी व अष्टपैलू पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. 2016 साली गोवा पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण दिल्लीत झाले होते. तेव्हाही त्यांची सर्वोत्कृष्ट बंदूक नेमबाज म्हणून निवड झाली होती. गोवा पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्यांची पहिली पोस्टींग कळंगुट पोलिस स्थानकात झाली. किनारपट्टी लाभलेल्या या परिसरात ड्रग्जचा फैलाव व संवदेशनशील परिसर याला सामोरे जाताना अनेक अडचणींवर मात केली. त्यांनी त्यानंतर कोलवा, म्हापसा व पणजी पोलिस स्थानकात काम केले आहे.

शोध घेण्यात तरबेज!

कळंगुट पोलिस स्थानकात असताना विदेशी महिलांची संशयावरून ड्रग्जप्रकरणी झडती घेताना, त्या हिंसक बनतात. अशावेळी शांत राहून त्यांच्यावरील कारवाई करताना त्यांना यश आले आहे. चोरीच्या प्रकरणात तर संशयितांकडून माहिती वदवून घेण्याची त्यांची वेगळी अशी स्टाईल आहे. संशयिताला सुटकेसाठी मदत करण्याचे आश्‍वासन देऊन त्याच्याकडून इत्थंभूत काढण्याचा त्यांचा हातखंडा आहे.

सुप्रसिद्ध गीत...

‘साथ कोरोनाची जगभर आयली!

करचे किदे कळेना!

सगळ्या देशांनी सोदले उपाय !

पुण वखद लेगीत मेळले ना! वेक्सिन लेगीद आयले ना!

आमी लॉकडाऊन तोडची ना

घरा भायर सरची ना!

आमका भोवचे शे दिसता सगळीकडे

पुण आमी कायदो मोडची ना...’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com