Heat Wave  Dainik Gomantak
गोवा

IMD Goa: येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता

मागील दोन-चार दिवसांपासून राज्यात कमालीची उष्णता जाणवू लागली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IMD Goa उन्हाळा सुरु होताच गोवेकरांना उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. मागील दोन-चार दिवसांपासून राज्यात कमालीची उष्णता जाणवू लागली आहे. रात्रीचा हलका गारवा कायम असला तरी दिवसा उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. गेल्या चार दिवसांत तापमानात वाढ झाल्याने दुपारनंतर रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत.

याच संदर्भात हवामान विभागाकडून एक महत्वाची अपडेट समोर येतेय. आज म्हणजेच (दि. 8) आणि 9 मार्च रोजी गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील दैनंदिन कमाल तापमानापेक्षा या दोन दिवसातील तापमान हे 4 ते 6 डिग्री सेल्सियसने जास्त राहणार असल्याचे IMD Goa ने सांगितले आहे.

राज्यात तापमानात वाढ झाली असून उकाडाही वाढला आहे. गोव्यासह लगतच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा वर चढलेला आढळला.

उष्णता वाढल्याने लोकांनी घराबाहेर पडताना शक्यतो दुपारची 12 ते 3 पर्यंतची वेळ टाळावी. आहारात लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत यांचा आवर्जून समावेश करावा. तसेच घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ वगैरेंचा वापर करावा. शक्यतो सुती कपडे वापरावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT