Banastarim New Market: बाणस्तारी येथील नव्या मार्केटमधील सोपोची जागा स्थानिकांना न देता बाहेरच्यांना दिल्यामुळे स्थानिक भोमा-आडकोण पंचायत क्षेत्रातील युवकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. आदिवासी कल्याण निधीतून या मार्केटची उभारणी झाली असल्याने त्यात 40 टक्के जागा या स्थानिकांना दिल्या पाहिजेत, अशी येथील विक्रेत्यांची मागणी आहे.
आदिवासी कल्याण निधीतून बाणस्तारी येथे सुसज्ज असे मार्केट उभारले गेले आहे. बाणस्तारीतील माटोळीचा बाजार प्रसिद्ध असून तो रस्त्यावर भरतो. त्यामुळे होणारी गर्दी व वाहतूक कोंडी पाहता येथे मार्केटची आवश्यक होती. ही मागणी लक्षात घेऊन आदिवासी कल्याण निधीचा वापर करून येथे मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. परंतु, तेथील सोपोंचे वाटप करताना स्थानिकांना संधी दिली नसल्याची तक्रार येथील विक्रेत्यांची आहे.
सोपोंचे ज्यांना वाटप करण्यात आले आहे, त्यांनी त्याठिकाणी नावेही टाकली आहेत. त्याला येथील स्थानिक युवकांनी विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येथील सरपंचाने मनमानी करून हे सोपोंचे वाटप केले आहे.
विशेष ग्रामसभा झालीच नाही
मार्केटमधील सोपो वाटपांविषयी विशेष ग्रामसभा घेणार असल्याचे सरपंचांनी जाहीर केले होते, परंतु तसे न करता त्यांनी सोपोंचे वाटप केले आहे, त्यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यताही या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आता गप्प बसणार नाही, त्यामुळे सरपंचांनी आम्हाला सोपो मिळायला हवे आहेत. ४० टक्के जागा ही अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षीत ठेवायला हवी होती, पण तसे काहीच केले गेले नसल्याचे युवकांचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.