Lairai Jatra: "सरकारला प्रत्येकाच्या जिवाची काळजी आहे", श्री लईराई जत्रेच्या पार्श्वभूमीवर CM सावंतांचे संयम बाळगण्याचे आवाहन Video

Shirgao Jatra: शिरगाव जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिरगाव येथे जाऊन शिरगावमधील व्यवस्था आणि उपाययोजनेच्या कामांची पाहणी केली.
 Lairai jatra utsav shirgao
Lairai jatra utsav shirgaoDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सरकारला प्रत्येकाच्या जिवाची काळजी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करून श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी धोंड भक्तगण आणि देवीच्या समस्त भाविकांनी संयम बाळगून शिस्त आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. शिरगाव जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी (गुरुवारी) शिरगाव येथे जाऊन शिरगावमधील व्यवस्था आणि उपाययोजनेच्या कामांची पाहणी केली.

यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, डिचोलीची पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., पोलिस निरीक्षक विजय राणे, वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस आदी विविध सरकारी खात्यांचे प्रमुख तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर अन्य पदाधिकारी आणि महाजन उपस्थित होते.

 Lairai jatra utsav shirgao
Lairai Jatra Shirgao: तारीख ठरली! लईराई देवीचा जत्रोत्सव 21 एप्रिल रोजी; 25 पर्यंत रंगणार पारंपरिक कौलोत्सव

उतरणी सपाट करण्याचे काम सुरू

धोंड तळीकडून होमकुंड स्थळी जाताना वाटेत लागणारी उतरणी कापून रस्ता सपाट करण्याचे काम सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम करण्यात येत आहे. गेल्यावर्षी याच परिसरात चेंगराचेंगरी होऊन सहा भक्तगण दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडले होते.

या कामाचीदेखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पाहणी केली. यंदा एप्रिल महिन्याच्या २१ तारखेला शिरगावची जत्रा होणार आहे. जत्रेच्या पंधरा दिवस अगोदर सर्व व्यवस्था आणि उपाययोजना जाग्यावर घालण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्री लईराई देवीचे दर्शन घेतले.

 Lairai jatra utsav shirgao
Lairai Jatra: लईराई देवीची जत्रेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना

मुख्यमंत्र्यांचे निर्देश...

१.मुख्यमंत्र्यांनी आमदार श्री. शेट यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि देवस्थान समितीसह गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झालेल्या जागेची तसेच होमकुंड आदी असुरक्षित जागांची पाहणी करून आढावा घेतला.

२.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय करता येईल यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि देवस्थान समितीकडून सूचना ऐकून घेतल्या.

३.गेल्या वर्षीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस आणि अन्य सरकारी यंत्रणांनी आत्तापासूनच नियोजन करावे.

४.गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना हाती घ्यावी. देवस्थान समितीनेही खास नियम करून त्यांची अंमलबजावणी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com