Morjim Turtle Conservation: कासवांच्या संवर्धनासाठी शांतता भंग नको

Morjim Turtle Conservation: सुजीतकुमार डोंगरे ः स्थानिकांच्या वावरावर निर्बंध, ध्वनिप्रदूषण टाळणे गरजेचे
Morjim Turtle Conservation:
Morjim Turtle Conservation: Dainik Gomantak

Morjim Turtle Conservation: मोरजी किनाऱ्यावर स्थानिकांच्या वावरावर निर्बंध घातले नाहीत आणि तेथील शांतता भंग केली, तर कासवे त्या किनाऱ्याकडे पाठ फिरवतील, अशी भीती पर्यावरण शिक्षण केंद्राचे मुख्य संशोधक सुजीतकुमार डोंगरे यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली.

Morjim Turtle Conservation:
CM Pramod Sawant: ‘राजस्थान सरकार गैरव्यवहारात प्रथम’

गेली 30 वर्षे कासव संवर्धन मोहीम सुरू आहे. अंड्यातून समुद्रात गेलेले कासव 25 वर्षानंतर त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यास येते. त्यामुळे आता कासवांची संख्या वाढलेली दिसते. ते वातावरण टिकवले नाही, तर मोरजीच्या किनाऱ्यावर कासवे अंडी घालण्यासाठी येत होती हा केवळ इतिहास ठरेल, असे ते म्हणाले.

डोंगरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली असता ते म्हणाले, कासवांचे संवर्धन हे स्थानिकांनीच सुरू केले होते. लोकसहभागातूनच निसर्ग व प्राणी संवर्धनाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे. कासवांमुळे आमचा रोजगार बुडाला असे कोणाला वाटता कामा नये. गरज आणि हव्यास यातील फरक समजून घेतला पाहिजे. तसे न करता सरसकटपणे बंदी लादल्याने नकोत ती कासवे असे कोणी म्‍हणाले, तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नये.

Morjim Turtle Conservation:
Ghumt Musical Instrument: घुमटाला लवकरच मिळणार ‘जीआय’

मोरजी, आश्वे, गालजीबाग किनाऱ्यावर कासवे परंपरागतरीत्या अंडी घालण्यासाठी येतात. ऑलिव्ह रिडले जातीची कासवे प्रामुख्याने येतात असे दिसून आले आहे. त्या ठिकाणी प्रखर प्रकाशझोत आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे, असे सुजीतकुमार डोंगरे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com