एल्विस गोम्स Dainik Gomantak
गोवा

Goa News: ..मग बांबोळीतील रस्ता कुणासाठी बदलला?

Goa News: भोमप्रश्नी एल्विस गोम्स यांचा सवाल : राज्यात भाजप सरकारची हुकूमशाही

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात सध्या भाजप सरकारची हुकूमशाही चालली असून दिल्लीहून येणाऱ्या सुटाबुटातील लोकांच्या भल्यासाठीच हे सरकार कार्यरत आहे. एकाचे दोन गोवा करण्याचे प्रयत्न सध्या चालले असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तथा फोंडा प्रभारी एल्विस गोम्स यांनी केला.

भोम येथील गावातून रस्ता नेण्यास भाजप सरकारकडून आग्रह धरला जात आहे. मात्र, बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयासमोरील चौपदरी रस्त्याचा नियोजित आराखडा कुणासाठी बदलला ते आधी स्पष्ट करावे, त्यासाठी खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान गोम्स यांनी भाजप सरकारला दिले आहे.

फोंड्यात आज काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गोम्स यांनी राज्यातील अनागोंदीवर बोट ठेवताना सर्वसामान्यांचा आवाज भाजप सरकार दाबू पाहात असल्याचे सांगितले. यावेळी फोंड्यातील काँग्रेसचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस राजेश वेरेकर, मेल्विन परेरा, जॉन परेरा तसेच भानुदास नाईक आदी उपस्थित होते.

‘गांधीजींच्या विचारांना लावला सुरूंग’

महात्मा गांधीजींनी ग्रामसंस्था मजबूत होण्यावर भर दिला, पण गांधीजींच्या विचारांनाच सुरूंग लावण्याचा प्रकार होत असून भाजपकडून अरेरावी चालल्याचे एल्विस गोम्स म्हणाले. राज्यात काँग्रेसकडून ग्रामपंचायती आणि पालिका मजबूत करून लोकांच्या विचारांना वाव देण्याचा आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न होईल, अशी ग्वाहीही गोम्स यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT