Beef: केरी तपासणी नाक्यावर 11 लाखांचे गोमांस जप्त

वाळपई पोलिसांची कारवाई: चालकाला जामीन
Beef
BeefDainik Gomantak

Beef: बेळगावहून गोव्याकडे येणाऱ्या गोमांसवाहू वाहनावर शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास केरी तपासणी नाक्यावर वाळपई पोलिसांनी धडक कारवाई करून सुमारे अकरा लाखांचे गोमांस जप्त केले.

Beef
Goa Electricity Problem: काणकोण तालुक्याला वीज खात्याची 84 कोटींची भेट

यावेळी संबंधित वाहनाच्या चालकाकडे परवानगीची कागदपत्रे आढळली नाहीत. किंवा मांस वाहतुकीसाठी आवश्‍यक कोणतीही काळजी घेतली नव्हती,असेही आढळले. दरम्यान, संध्याकाळी उशिरा संशयित सय्यद इस्माईल मंचानी (केपे) याची वाळपई न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली आहे.

यासंबंधी उसगाव फोंडा येथील गोप्रेमी राजीव झा यांनी वाळपई पोलिसात रितसर तक्रार नोंदवली आहे. यावेळी बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी केपे येथील टाटा योध्दा टेम्पो वाहन (जीए-09-06 यू 6352) तसेच संशयित सय्यद इस्माईल मंचानी (केपे) याला वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, वाळपई पोलिसांनी जप्त केलेल्या गोमांसाचा पंचनामा करुन पशुवैद्यकीय डाॅक्टरांकडून अहवाल घेतला आहे. केरी येथील ड्युटीवर असलेले बाबलो गावकर यांना गोप्रेमींनी वाहन ताब्यात घेण्यास मदत केली. पोलिस निरीक्षक दिनेश गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ठाकूर व सहकारी पुढील तपास करत आहेत.

पाठलाग करून पकडले वाहन

बेळगावहून गोव्याकडे गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती गोप्रेमी राजीव झा यांना मिळताच त्यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग केला. तसेच पोलिसांच्या मदतीने केरी सत्तरी येथे गोमांसासह संशयिताला ताब्यात घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com