CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ...तर विश्‍वगुरू बनण्याचे देशाचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही

डॉ. प्रमोद सावंत : डिचोलीत जिल्हास्तरीय ‘युवा उत्सव’ उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant प्रत्येक युवकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एकता और अखंडता’ या मंत्राला अनुसरून वाटचाल केली, तर विश्‍वगुरू बनण्याचे देशाचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

नेहरू युवा केंद्रातर्फे डिचोलीत आयोजित ‘युवा उत्सव’च्या उद्‌घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

देशात विविधता असली, तरी एकता आहे. देशासाठी आपणही काहीतरी देणे आहोत, ही भावना युवा पिढीने बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. डिचोली रोटरॅक्ट क्लब आणि नारायण झांट्ये महाविद्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात शनिवारी (ता.13) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उद्‌घाटन सोहळ्यास सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती. अन्य मान्यवरांत झांट्ये महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कुंभारजुवेकर, नेहरू युवा केंद्राचे संचालक प्रकाश मनुरे, उपसंचालक कालिदास घाटवळ, एड्स नियंत्रण सोसायटीचे संचालक डॉ. गोकुळदास सावंत आणि एनएसएस संचालक नितीन सावंत उपस्थित होते.

विविध स्पर्धांना प्रतिसाद

या उत्सवात कविता लेखन, मोबाईल फोटोग्राफी, पेंटिंग, भाषण, लोकनृत्य आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धांच्या माध्यमातून युवक-युवतींच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाले होते. या सोहळ्यात राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त गुणाजी मांद्रेकर यांचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

SCROLL FOR NEXT