Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: शिवोलीत बंगल्यावर दरोडा 14.76 लाखांचा ऐवज लंपास तर, दुर्भाट साईबाबा मंदिरातील फंडपेटी पळवली

Goa Theft Case: फंडपेटी मंदिराजवळच असलेल्या डोंगरावर निर्जन स्थळी टाकून देण्यात आली असून आतील सुमारे पन्नास हजार रूपये चोरट्यांनी पळवले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Theft Case

मार्ना-शिवोली येथील 'कॅन्टेम्पो' या आलिशान बंगल्यात बुधवारी रात्री चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे 11 लाख 61 हजार रुपयांचे सोने तसेच 3 लाख 15 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

तर, साईगड - आडपई - दुर्भाट येथील साईबाबा मंदिरात काल गुरुवारी रात्री चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून आतील फंडपेटी पळवली.

शिवोलीत बंगल्यावर दरोडा 14.76 लाखांचा ऐवज लंपास

चोरीची ही घटना शुक्रवारी पहाटे तीन ते सव्वासहाच्या दरम्यान करण्यात आली. सार्थक राजेश कुमार गुप्ता यांच्या आलिशान सदनिकेत ही चोरीची घटना घडली आहे.

यासंबंधी हणजुण पोलिसांत घरमालक गुप्ता यांनी रितसर तक्रार दाखल केली असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुराव्यांच्या आधारे हणजुण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संकेत पोखरे, निरीक्षक प्रशाल देसाई तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

दुर्भाट साईबाबा मंदिरातील फंडपेटी चोरट्यांनी पळवली, 60 हजार रुपये लंपास

फंडपेटी मंदिराजवळच असलेल्या डोंगरावर निर्जन स्थळी टाकून देण्यात आली असून आतील सुमारे पन्नास हजार रूपये चोरट्यांनी पळवले, असे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले.

आडपई दुर्भाट येथील डोंगरावर असलेल्या साईबाबा मंदिरात काल गुरुवारी रात्री चोरट्यांनी मंदिरात कुणीच नसल्याची संधी साधून ही चोरी केली. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मंदिरातील फंडपेटी उचलून नेण्यासाठी

दोन ते तीन चोरट्यांचा वापर झाला असावा असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांना मंदिराची सर्व माहिती असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला.

फंडपेटी डोंगरावर नेऊन फोडली

चोरट्यांनी ही फंडपेटी डोंगरावर नेऊन फोडली व आतील चिल्लर नाणी वगळता इतर कागदी नोटा पळवल्या. मंदिराचा पुजारी आपल्या मूळ गावी गेल्यामुळे मंदिरात कुणीच नसल्याची माहिती चोरट्यांना असावी त्यामुळेच ही चोरी झाली असेही मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT