Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa:  Dainik Gomantak
गोवा

Goa Chandreshwar Temple: पर्वत पारोडातील चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरात चोरी

फंडपेटी फोडून सुमारे दहा हजार रुपयांची चोरी

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात चोरीच्या घटना बऱ्याच वाढल्या असून रविवारी (ता.११) रात्री पर्वत परोडा येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानातील फंडपेटी फोडून सुमारे दहा हजार रुपयांची चोरी करण्यात आली.

गेल्या रविवारी केपे बाजारात प्रवासी बसमध्ये चढताना दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरून नेल्या होत्या, हे प्रकरण ताजे असताना आता ही चोरी झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १२.३० ते २.३० वा.दरम्यान चोरी झाली. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दोघा चोरट्यांनी आत प्रवेश करून फंडपेटी ओढून मंदिराच्या पाठीमागे आणली. नंतर ती फंडपेटी फोडून आतील रक्कम चोरून नेली.

सोमवारी (ता.१२) सकाळी मंदिरातील बाहेर पेटणारे विजेचे दिवे बंद करण्यासाठी मंदिर कर्मचारीआले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. हा चोरीचा प्रकार मंदिरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मंदिराचे मुख्यत्यार पंडित देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यांपूर्वी ही फंडपेटी उघडून आतील पैसे काढले होते व आता फक्त दोन आठवड्यांचे पैसे फंडपेटीत होते.

सुरक्षा रक्षक कुठे गेले होते?

मंदिराच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असून रविवारी रात्री ते कामावर आले नव्हते. चोरीचा शोध घेण्यासाठी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी दाखल केले होते. केपे पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी मंदिरांतील फंडपेट्या फोडण्याचे सत्र आरंभले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT