Theft in Temple Quepem Dainik Gomantak
गोवा

मंदिरातील फंड पेटी चोरुन हजारोंची लूट

केपेमध्ये दत्त मंदिरात चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दैनिक गोमन्तक

केपे : केपे येथील दत्त मंदिरातील फंड पेटी चोरून नेऊन त्यातील सुमारे चाळीस हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे. सदर चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार 21 मे रोजी पहाटे तीन वाजता चोरी झाल्याचे सीसीटीव्हीमधून उघडकीस आले आहे.

चोरट्यांपैकी एकाने मंदिराच्या खिडकीचा लोखंडी गज कापून आत प्रवेश केला आणि मुख्य दार उघडले. यानंतर चोरट्याने आपल्या बाकीच्या दोन साथीदारांना आत घेतले. मंदिरातील भली मोठी फंड पेटी फोडण्यास यश न आल्याने अखेर चोरट्यांनी फंड पेटी उचलून बाहेर नेली. चोरट्यांनी मंदिराशेजारी वाहणाऱ्या कुशावती नदीकाठावर नेऊन पेटी फोडली आणि आतील पैसे चोरुन नेले.

सदर प्रकार सकाळी भटजी मंदिरात आले असता त्यांना समजल्याने त्याने त्वरित मंदिर समितीला आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसेच श्वान पथकाला आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. एक वर्षापूर्वी या मंदिरातील फंड पेटी फोडण्यात आली होती आणि आता परत हा प्रकार घडल्याने या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पावसाचा फायदा घेऊन चोरी करण्याचे प्रकार दर पावसाळ्यात दिसून येत असल्याने पोलिसांनी प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी सुरू करावी. तसेच पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी लोकांनी केली आहे.

मंदिराच्या शेजारी मंदिराचे पुजारी राहत असून त्यांना या चोरीचा कोणताच सुगावा लागला नाही. चोरी करण्यास आलेल्या चोरांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होती. चोरी करताना एक चोर पुजारी राहतो त्या घराकडे लक्ष देऊन होता हे स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत आहे. साधारण पाच लोकांना उचलून नेण्यास शक्य होणार नाही इतक्या वजनाची फंड पेटी तीन चोरांनी सहज उचलून नेल्याने केपेतील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT