Bicholim Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Bicholim Temple Theft: डिचोलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 4 दिवसांत दोन मंदिरांमध्ये चोरीच्या घटना

डिचोलीमध्ये सध्या चोरांची टोळी सक्रिय झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Bicholim Temple Theft: डिचोलीमध्ये सध्या चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. मागील चार दिवसात डिचोलीमध्ये दोन मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चोरांनी मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे. कासारपालमध्येही अशीच घटना घडली आहे.

माहितीनुसार, कासारपाल येथील श्री सातेरी भूमिका मंदिरात चोरट्यांनी फंडपेटी फोडली. यामधून सुमारे 12 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

याबद्दल पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या मागील चार दिवसात दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. डिचोली, लाडफे गावातील मंदीरातही चोरी झाली आहे. मंदीराचा टाळा तोडून चोरट्यांनी तिथली फंडपेटी चोरी केली.

मंदिराचे मुख्य दार तोडून चोरट्यांनी देवळातील फंडपेटी पळवली. फंडपेटी बाहेर घेऊन देवळापासून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातून दहा हजार रूपये चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चोरट्यांनी फंडपेटी तेथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या दोन्ही घटनांमुळे डिचोलीमध्ये चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

Pakistan: बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी! पाकिस्तानी कोस्ट गार्डच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला; 30 हून अधिक जवान ठार VIDEO

Morjim: ...अन् चिमुरड्याचा वाचला जीव! आमदार जीत आरोलकर यांची मदत ठरली वरदान

Goa Agriculture: पावसाच्या सरींनी फुलली शेतकऱ्यांची आशा; डिचोलीत शेतीकामे सुरू, कृषी खातंही सज्ज

SCROLL FOR NEXT