Mapusa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News: पती-पत्नी डॉक्टरकडे गेले अन् चोरट्यांनी डाव साधला; मोंते गिरीत बंगला फोडून रोकड, दागिने लंपास

मोंते गिरी, बार्देश येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Crime News: पती - पत्नी घरातून डॉक्टरकडे गेले असता याचवेळी चोरट्यांनी डाव साधत बंगला फोडला. चोरट्यांनी बंगल्यातून रोख रक्कम आणि दागिने लंपास केले आहेत.

मोंते गिरी, बार्देश येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी आंतोनेथ डिक्रुझ यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डिक्रुझ या त्यांच्या पतीसह दवाखान्यात गेल्या होत्या, दरम्यान चोरट्यांनी घरात कोणी नाही याच संधीचा फायदा घेत बंगल्याचा मुख्य दरवाजा, कडीसह तोडला व घरातील रोख रक्कम आणि दागिने लंपास केले.

डिक्रुझ घरी आल्या त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना दिसले. डिक्रुझ यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत याप्रकरणी फिर्याद दाखल केली.

पोलीस निरीक्षक सीताकांत नायक यांच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मुख्य लोकवस्तीत झालेल्या या चोरीमुळे या परिसरात खळबळ निर्माण झाली असून, येथील कोणीतरी ही चोरी केली असल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमिफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

SCROLL FOR NEXT