complaint note ponda police station Dainik Gomantak
गोवा

मडकई नवदुर्गा सोसायटीत चोरी

फोंडा पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला

दैनिक गोमन्तक

फोंडा: मडकईतील नवदुर्गा सोसायटीत चोरट्यांनी काल रात्री एका लॅपटॉपसह काही चिल्लर रक्कम पळवली. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. या चोरीत एकापेक्षा जास्त चोरटे सहभागी झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. मडकईतील नवदुर्गा सोसायटी ही सर्वांत मोठी सोसायटी व पतसंस्था आहे. या संस्थेतून बँकिंग व्यवहारही मोठ्या प्रमाणात केले जातात. रात्री चोरट्यांनी या सोसायटीचा पुढील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. शेवटी त्यांनी कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी ग्रिल्स काढून आत प्रवेश केला. कपाटे उघडून त्यांनी पैशांचा शोध घेण्यासाठी आतील सामान, फाईल्स अस्ताव्यस्त फेकल्या. मात्र, त्यांच्या हाती केवळ चिल्लर रक्कम लागली. चोरट्यांनी एक लॅपटॉप पळवला असून जाताना लगतच्या दूध सोसायटीतही चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. याप्रकरणी नवदुर्गा सोसायटीचे अध्यक्ष प्रेमानंद गावडे यांनी फोंडा पोलिसात तक्रार दिली. चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT