Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Theft News: हॉटेलमध्ये चोरीसाठी गेला अन् बांगडा तळून खाल्ला! म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ

Goa Theft News: बाजारपेठेतील हॉटेल, दुकानांना केले लक्ष्य; एकास अटक

Shreya Dewalkar

Goa Theft News: म्हापसा येथील बाजारपेठेतील दुकानांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी बराच धुमाकूळ घातला आहे. मार्केट परिसरात पोलिस गस्त असतानाही चोरीचे प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी चार-पाच दुकाने फोडली. यात ‘शांतादुर्गा हॉटेल’च्या गल्ल्यावर डल्ला मारण्यासह ‘समाधान हॉटेल’मध्ये चोरांने बांगडे तळून खाण्याचीही आश्चर्यकारक घटना घडली आहे.

मंगळवारी ‘समाधान हॉटेल’मध्ये एक संशयित चंदन हरिहर दास (१८, मूळ बिहार) हा झोपलेल्या अवस्थेत सापडला. नंतर हॉटेलमालकाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आज पहाटे 5.30 च्या सुमारास उघडकीस आला.

संशयित ‘शांतादुर्गा हॉटेल’च्या बाहेरील पाण्याच्या टाकीवरून ‘रोहिणी ब्युटी पार्लर’मध्ये घुसला. तिथे काहीच हाती न लागल्याने आतील सामान संशयिताने जाळले. यात पार्लरचे नुकसान झाले. त्यानंतर संशयित पोटमाळ्यावरून ‘शांतादुर्गा हॉटेल’मध्ये खाली उतरला. हॉटेलच्या ‘कॅश काउंटर’मध्ये पैसे नसल्याने त्यात त्याने आग घातली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडले.

24 तास गस्तीचे आश्वासन

म्हापसा बाजारातील चोरींच्या घटनांप्रकरणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत, खजिनदार जितेंद्र फळारी व पांडुरंग सावंत यांनी पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी व निरीक्षक सीताकांत नायक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व मार्केटमध्ये घडणाऱ्या चोऱ्या आणि इतर प्रकारांवर आळा घालण्याची मागणी केली. पोलिस गस्त वाढवून मार्केट परिसरात यापुढे आजपासून चोवीस तास पोलिसांचा पहारा ठेवला जाईल, असे आश्वासन उपअधीक्षकांनी या व्यापाऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT