Road Making
Road Making Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: सत्तरीतील रस्त्यांची कामे दर्जेदार होणार

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत व दोन्ही मतदारसंघांतील कोणत्याही रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पर्ये मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी प्राप्त झालेली आहे. टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण होतील, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले. 

पर्ये मतदारसंघातील भिरोंडा पंचायत क्षेत्रातील भिरोंडा ते पिसुर्ले या 16 किलोमीटर रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ होळीच्या शुभमुहूर्तावर सावर्शे गावातून करण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर पर्ये मतदारसंघाच्या आमदार दिव्या राणे, नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे, भिरोंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, उपसरपंच रूपाली गावकर, रंजना राणे, बाबूराव गावडे, किरण गावडे, मनीषा पिळयेकर, विदेश नाईक, पिसुर्ले पंचायतीचे सरपंच देवानंद परब,  सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता तामोस्कर, देवेंद्र वेलिंगकर, अरविंद सावईकर आदींची उपस्थिती होती.

आमदार दिव्या राणे यांनी होळीच्या सणादिवशीही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. दोन्ही मतदारसंघ आदर्श व्हावेत यासाठी विविध स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. सूत्रसंचालन उदयसिंग राणे यांनी केले.

सत्तरीच्या ग्रामीण भागात आवश्यक साधनसुविधा आणून गावाचा विकास करण्याचा आपला सदैव प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून सत्तरीतील नागरिकांची जीवनशैली बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

या रस्त्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या सुटल्याबद्दल आनंद होत आहे. त्याचप्रमाणे पर्ये मतदारसंघाच्या आमदार दिव्या राणे या चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. सर्वांनी त्यांना सहकार्य करावे.

- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

SCROLL FOR NEXT