Goa Traffic Police: बेजबाबदार वाहनचालकांना 35 दिवसांत 16 लाखांचा दंड

म्हापसा उपविभागाची कारवाई ः नियमांचे पालन करण्याचे आवाहन
Goa Traffic Cell | Traffic Violations
Goa Traffic Cell | Traffic ViolationsFile Photo

म्हापसा उपविभागाने वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी चालकांकडून फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत 16 लाख रुपये दंड वसूल केला. तर छायाचित्रण उपक्रमाद्वारे वाहतूक उल्लंघनासाठी 300 जणांना नोटिसा बजावल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना म्हापसा उपविभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन देण्याचे आक्रमक अभियान सुरू केले आहे.

म्हापसा उपविभागाने सुरू केलेल्या फोटोग्राफी उपक्रमात हणजूण पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 80 नोटिसा बजावल्या. म्हापसा पोलिसांनी वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना 70 नोटिसा बजावल्या आहेत आणि कोलवाळ पोलिस स्टेशनने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 70 नोटिसा बजावल्या आहेत.

एसडीपीओ म्हापसा जीवबा दळवी यांच्या म्हणण्यानुसार, नियमांचे उल्लंघन कमी झाले असले तरी अजूनही हेल्मेट न घालता अनेकजण गाडी चालवत आहेत. आणि त्यामुळेच चलन देणे सुरू आहे.

Goa Traffic Cell | Traffic Violations
कारवाईचे पोकळ इशारे नको; प्रत्‍यक्ष कृती करा

1116 गुन्हे दाखल

हणजूण पोलिस स्थानकात 1116 गुन्हे दाखल केले असून 6 लाख 44 हजार रुपये दंड वसूल केला. म्हापसा पोलिस स्थानकात 951 गुन्हे दाखल केले आहेत आणि 4 लाख 82 हजार रुपये जमा झाले आहेत.

कोलवाळ पोलिस स्थानकात 756 गुन्हे दाखल केले असून 4 लाख 77 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.एकूण दंड 16 लाख तीन हजार 500 रुपये वसूल केला आहे. फेब्रुवारी 2023 ते 7 मार्चपर्यंतची ही दंडाची रक्कम आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com