Supreme Court Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘सेक्‍सवर्कर’ हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या पुस्‍तिकेतून वगळला

Goa News: ‘लैंगिक अत्‍याचाराविरोधातील लढा’ या विषयावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने तयार केलेल्‍या पुस्‍तिकेत असलेल्‍या ‘सेक्‍स वर्कर’ या शब्दाला गोव्‍यातील ‘अर्ज’ या संघटनेसह देशातील मानव तस्‍करी प्रकरणात काम करणाऱ्या अनेक ‘एनजीओ’नी हरकत घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या हरकतीची दखल घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने आपल्‍या पुस्‍तिकेतून शेवटी हा शब्द वगळला.

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘लैंगिक अत्‍याचाराविरोधातील लढा’ या विषयावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने तयार केलेल्‍या पुस्‍तिकेत असलेल्‍या ‘सेक्‍स वर्कर’ या शब्दाला गोव्‍यातील ‘अर्ज’ या संघटनेसह देशातील मानव तस्‍करी प्रकरणात काम करणाऱ्या अनेक ‘एनजीओ’नी हरकत घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या हरकतीची दखल घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने आपल्‍या पुस्‍तिकेतून शेवटी हा शब्द वगळला.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सहाय्‍यक रजिस्‍ट्रार अनुराग भास्‍कर यांनी या संघटनांना पाठविलेल्‍या ई-मेलमध्‍ये त्‍यांनी घेतलेल्‍या हरकतीची सरन्‍यायाधीशांनी दखल घेतली असून या पुस्‍तिकेतून ‘सेक्‍स वर्कर’ हा शब्द काढून त्‍या जागी ‘तस्‍करी पीडित’ हा शब्द वापरण्‍यात येईल. तर ‘वेश्‍‍या व्‍यावसायिक महिला’ या शब्दाऐवजी ‘वेश्‍‍या व्‍यवसाय लादलेल्‍या महिला’ या शब्दांचा वापर केला जाईल, असे म्‍हटले आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने ऑगस्‍ट 2023 मध्‍ये जी पुस्‍तिका प्रकाशित केली होती. त्‍यातील उपरोक्त दोन शब्दांना ‘एनजीओ’नी हरकत घेऊन सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांना पत्र पाठवले. या महिलांची तस्‍करी करून त्‍यांना वेश्‍या व्‍यवसायात आणले जाते. त्‍यामुळे एकाअर्थी त्‍या तस्‍करी पीडित महिला आहेत. त्‍यामुळे त्‍यांचा उल्‍लेख ‘सेक्‍स वर्कर’ असा करणे योग्‍य नव्‍हे, असे पत्रात लिहिले होते.
-अरुण पांडे,‘अर्ज’चे संस्‍थापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT