Babush Monserrate |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023 : शेतजमिनीच्‍या हस्तांतरणावर आता येणार निर्बंध : विधेयक पटलावर

बिगरगोमंतकीय जमीन खरेदीदाराला तीन वर्षे करावी लागणार शेती

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Budget Session 2023: राज्यातील शेतजमीन राखून ठेवण्यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत. शेतजमिनीची विक्री परराज्यातील खरेदीदाराला करताना त्यास तीन वर्षे शेती करावी लागेल.

शेती न केल्यास ती शेतजमीन त्‍याच्‍याकडून काढून घेतली जाईल असे शेतजमीन हस्तांतरणावर निर्बंध आणणारे विधेयक सोमवारी विधानसभेत पटलावर ठेवण्यात आले.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सदर विधेयक मांडले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास लागवडीखाली असणारी शेतजमीन संरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

परराज्यांतील लोक शेतजमीन खरेदी करतात, परंतु शेती करीत नाहीत. त्यामुळे आता शेतजमीन खरेदी करताना खरेदीदारास शेती करण्याची अट पाळावी लागणार आहे. मात्र खरेदीदार गोव्यातीलच असेल तर त्याला ही अट लागू होणार नाही, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

शेतजमीन खरेदी केल्यानंतर खरेदीदारास ती जमीन तीन वर्षे लागवडीखाली ठेवावी लागणार आहे. शिवाय अशा प्रकारच्या जमिनी लागवडीखाली आहेत की नाहीत, यावर कृषी खात्याला नजर ठेवावी लागणार असल्याचेही मोन्सेरात यांनी सांगितले.

दरम्यान, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, नगरविकास आराखडा, विधानसभा डिप्लोमा, महामार्ग कायदा अशी इतर विधेयके आज पटलावर ठेवण्यात आली. त्यावर चर्चा होऊन ती मंजूर होतील.

बांधकामासाठीचा अर्ज 15 दिवसांत निघणार निकाली

नगरपालिका दुरुस्ती विधेयक पटलावर आले आहे. त्‍यामुळे बांधकामासाठी नगरपालिकेकडे आलेला अर्ज 60 दिवसांऐवजी आता 15 दिवसांत निकाली निघणार आहे.

शिवाय एखाद्या ‘अ‘ वर्ग पालिकेत 20 सदस्य असतील आणि प्रत्येक प्रभागात अडीच हजार मतदारसंख्या असेल, म्हणजेच 50 हजारांवर ती मतदारसंख्या जाईल, त्याठिकाणी 25 पेक्षा जास्त नगरसेवक संख्या वाढणार नाही.

तसेच ‘ब'' वर्ग पालिकेत कमीत कमी 12 नगरसेवक असतील. प्रत्येकजण अडीच हजार मतदारसंख्या असलेल्या प्रभागातून निवडून येईल. म्हणजेच 10 हजारांपेक्षा जास्त मतदार असल्यास नगरसेवक संख्या 20 पेक्षा जास्त होणार नाही. ‘क’ वर्गातील पालिका सदस्य संख्या दहा राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Margao: 'सोपो' शुल्कात कोणतीही वाढ नाही, जुनेच दर कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका; मडगाव पालिकेचं स्पष्टीकरण

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

SCROLL FOR NEXT