Goa Budget Session 2023 : खाजन बांधांची सुरक्षितता तपासली जाणार : कृषीमंत्री नाईक

आमदार कार्लुस फेरेरा यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर
Agriculture Minister Ravi Naik
Agriculture Minister Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या खाजन शेतीचे बांध फुटल्यानंतर खारे पाणी आत येते. त्यामुळे शेतजमीन क्षारयुक्त बनते. सर्व मानशींवरील बांधांची सुरक्षितता अधिकाऱ्यांमार्फत तपासली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी सभागृहाला दिली.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी हळदोणा या आपल्या मतदरासंघाच्या अनुषंगाने प्रश्‍न उपस्थित केले होते. खारे पाणी मानशीत शिरल्यानंतर आजूबाजूच्या विहिरींतही खारे पाणी झिरपून येत आहे. त्यामुळे मतदारसंघातील 12 खाजन बांध मजबूत करावेत.

Agriculture Minister Ravi Naik
Rahul Gandhi Disqualification: गोव्यात युवक कॉंग्रेसचे राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन; सरकारवर टीका

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, काही ठिकाणी शेतकरी स्वतः बांधांची देखभाल करतात. आपण कृषीमंत्री असताना आजोशी येथील बांधाची दुरुस्ती पाच लाख रुपये खर्चून केली होती. राज्य सरकारने या बांधदुरुस्तीसाठी मनरेगाचे पैसे खर्च करावेत. खाजन धोरण तयार करावे, असेही त्यांनी सुचविले.

आमदार केदार नाईक म्हणाले, नेरुल येथे बांध तुटल्याने खारे पाणी शेतात घुसले आणि चार लाख चौरस मीटर शेती खाऱ्या पाण्याखाली गेली. स्वयंपूर्ण मित्रांना घेऊन तपासणी करावी. कारण त्याठिकाणी आता मोठ्या प्रमाणात खारफुटी वाढली आहे, ती काढायला गेल्यास गुन्हे दाखल होतील, असेही त्यांनी नमूद केले.

Agriculture Minister Ravi Naik
Goa Economic Survey 2023 : विकासदरात 10.33 टक्के वाढ अपेक्षित : आर्थिक पाहणी अहवाल

मोडलेल्‍या बांधांची त्‍वरित दुरुस्‍ती गरजेची

बांध तुटले तर कोणत्या खात्याची जबाबदारी आहे, ते कळत नाही. त्यासाठी महसूल, कृषी आणि जलस्रोत खात्याकडे धावावे लागते. बांध मोडला तर तात्काळ त्याची दुरुस्ती होत नाही. आजोशी, डोंगरी, मंडूर या ठिकाणी बांध फुटल्याने घरात पाणी शिरले होते, याची आठवण आमदार वीरेश बोरकर यांनी करून दिली.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये मतदारसंघात तीन बांध बांधण्यास सुरूवात झाली आहे, शिवाय यापूर्वीचे बांध फुटले तर वेळेत दुरुस्त केले जात नसल्याचे सांगितले. आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स, व्हेंझी व्हिएगस, दिलायला लोबो, क्रुझ सिल्वा यांनीही आपापल्या मतदारसंघातील बांधाविषयीच्या समस्या मांडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com