burning bike Dainik Gomantak
गोवा

मुंडवेल वाडे,वास्को येथे बर्निंग बाईकचा थरार

प्रसंगावधानामूळे अधिकची हाणी टळली

दैनिक गोमन्तक

वास्को: मुंडवेल वाडे वास्को येथे शुक्रवारी सकाळी दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. यात दुचाकी जुळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार मुडवेल वाडे वास्को येथे पेट्रोल पंप शेजारी पार्क करून ठेवलेल्या दुचाकीला अचानक आग लागून संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. जवळच असलेल्या लोकांनी प्रसंग प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणली. तसेच या आगीत आणखी दुचाकी खाक होण्यापासून वाचवल्या. (The thrill of burning bikes at Vasco )

जळलेली दुचाकीचा चालक आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क करून एटीएममध्ये गेला होता. बाहेर आला व त्याला लोकांची गर्दी दिसली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्याच्या दुचाकीला आग लागल्याचे नजरेस पडले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान हल्लीच जवळच असलेले अग्निशमन दल दाबोळी येथे हलवण्यात आल्याने, तेथे त्यांना फोनची व्यवस्था नसल्याने त्यांचा नंबर नॉट रिचेबल येत आहे. सदर अग्निशमन दल आज त्याच ठिकाणी असते तर सदर दुचाकीचे एवढे नुकसान झाले नसते. माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत याविषयी बोलताना अग्निशमन दल दाबोळी येथे हलवण्यात आल्याने वाहनात आगीच्या घटना घडल्यास मोठा अनर्थ होणार आहे.

तसेच शहरात पेट्रोल पंप आहे. त्यासाठी अग्निशमन दलाने फोनची व्यवस्था करावी. तसेच एक बंब वास्कोत ठेवावा जेणेकरून आपत्यकालीन वेळी तत्काळ सेवा देऊ शकणार अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT