Goa Temperature Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: तापमानाचा पारा 33.6 अंशांवर, उकाडा वाढला

Goa Weather Update: पुढील पाच दिवस वातावरण कोरडेच राहणार

दैनिक गोमन्तक

Goa Weather Update:

राज्यात मागील दोन आठवड्यापासून कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यात वाढलेल्या उष्म्‍यातून लोक घामाघून होत असून उष्म्याने अंगाची लाही-लाही होत आहे. आज राज्यातील तापमानाचा कमाल पारा 33.6 अंश सेल्सिअस इतका वाढला आहे.

राज्यातील आर्द्रतादेखील अधिक असल्याने तसेच सकाळपासून दमट वातावरण असल्याने उकाड्याने लोक त्रस्त झाले. राज्यात गुरूवारी तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली होती. मात्र, कोठेही पाऊस पडल्याची नोंद नव्हती.

पुढील पाच दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात मोठे बदल घडणार नाहीत. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. गुरूवारी राज्यातील कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस, तर किमान 26.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT