Goa Mining Case Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: डिचोली-लाटंबार्सेत चिरेखाणीवर छापा

Goa Mining Case: भरारी पथकाची कामगिरी: पॉवर टिलर, जनरेटरसह यंत्रसामग्री जप्त

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: डिचोली तालुक्यातील लाटंबार्से येथे एका बेकायदा चिरेखाणीवर भरारी पथकाने छापा टाकून चिरे काढण्याखाणी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त केली. डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) सायंकाळी ही कारवाई केली.

या कारवाईवेळी खाण आणि भूगर्भ खात्याचे सहायक भूगर्भतज्ज्ञ नितीन आरोस्कर, तलाठी फटगो गावकर आणि राजेंद्र नाईक यांचा सहभाग होता.

भरारी पथकाने अचानक धाड टाकली, तेव्हा लाटंबार्से येथील सर्व्हे नं-६५५/० या जमिनीत बेकायदा चिरेखाण चालत असल्याचे आढळून आले.

या छाप्यावेळी भरारी पथकाने चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारा कटरसह पॉवर टिलर, एक जनरेटर आदी यंत्रसामग्री जप्त केली. जप्त केलेली यंत्रसामग्री डिचोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. महिन्यापूर्वी पोलिसांनी मये येथे एका चिरेखाणीवर धाड घालून चारजणांना अटक करुन यंत्रसामग्री जप्त केली होती. आता लाटंबार्से येथील कारवाईमुळे बेकायदा चिरेखाण व्यवसायात असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT