Mahadayi River | Mahadayi Water Dispute Goa Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रकरणी गोव्याच्या याचिकेवर 8 ऑगस्टला सुनावणी? 'कायदा आमच्या बाजूने...'

Supreme Court: म्हादईच्या प्रकरणावरुन गोवा आणि कर्नाटक यांच्यात गेल्या दशकापासून सुरु असलेला वाद पुन्हा तापला आहे.

Manish Jadhav

म्हादईच्या प्रकरणावरुन गोवा आणि कर्नाटक यांच्यात गेल्या दशकापासून सुरु असलेला वाद पुन्हा तापला आहे. यातच आता, या प्रकरणावर गोव्याच्या आव्हान याचिकेवर गुरुवारी (8 ऑगस्ट) सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुनावणीच्या वेळी म्हादई याचिकेचा समावेश असल्याचे अॅड. जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.

दरम्यान, गोवा सरकारकडून (Government) म्हादई प्रकरणावर कर्नाटकविरोधात सुप्रीम कोर्टात दोन अवमान याचिका दाखल केल्या आहेत. याशिवाय, सावंत सरकारने म्हादई लवादाच्या निवाड्याला आव्हाने दिले आहे. आता गुरुवारी या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सावंत सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, म्हादई प्रश्नावर गोव्याची बाजू अगदी भक्कम आहे.

दुसरीकडे, गेल्या महिन्यात म्हादई प्रकरणावर स्थापन करण्यात आलेल्या प्रवाह समितीने म्हादई नदीच्या पात्राची पाहणी केली होती. हणजूण, आमठाणे धरणांसह कुणकुंबी परिसराची देखील समितीने पाहणी केली होती. विशेष म्हणजे, या पाहणीदरम्यान गोवा पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पाणीपुरवठा मंत्री सुभाष शिरोडकर (Subhash Shirodkar) यांनी सांगितले की, प्रवाह समितीकडून करण्यात आलेली पाहणी गोव्यासाठी पूरक आहे.

म्हादई अभयारण्य परिसरात ही नदी येते. अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या नदीचे पाणी वळवण्यास कायद्याने बंदी आहे. हा मुद्दा गोव्यासाठी (Goa) अनुकुल आहे. तसेच, कायदाही गोव्याच्या बाजूने आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा सरकार गुरुवारी (6 ऑगस्ट) होणाऱ्या सुनावणीसाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT